बोदवड येथे शांतता समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 19:28 IST2019-10-06T19:28:02+5:302019-10-06T19:28:53+5:30
दसरा पालखी व नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीत आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन उपविभागीय मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश जाधव यांनी केले आहे.

बोदवड येथे शांतता समितीची बैठक
बोदवड, जि.जळगाव : दसरा पालखी व नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीत आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन उपविभागीय मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश जाधव यांनी केले आहे.
आगामी दिवसात दसरा पालखी व दुर्गा विसर्जन शांततेत साजरे करावे यासाठी रविवारी येथील पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली.
यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव, बोदवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील खरे, व्यापारी संघाचे गोपाल अग्रवाल, भारत पाटील, राजेश नानवणी, कैलास जावरे, सुधाकर पाटील, दसरा पालखीचे पप्पू शर्मा, जामा मशिदीचे मौलवी अमीन तसेच नवदुर्गा मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलीस अधिकारी जाधव यांनी दसरा पालखी तसेच नवदुर्गा विसर्जन हे दोन्ही सण आचारसंहिता काळात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कायदा सुवव्यवस्था अबाधित राहील, अशा पद्धतीने साजरे करून शहरातील शांतता कायम ठेवण्याचे आवाहन केले.