विधानसभा अध्यक्षांची चाळीसगाव येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 12:06 IST2019-09-03T12:05:42+5:302019-09-03T12:06:15+5:30

धावती भेट

Meeting of office bearers and workers at Chalisgaon | विधानसभा अध्यक्षांची चाळीसगाव येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा

विधानसभा अध्यक्षांची चाळीसगाव येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा

चाळीसगाव, जि. जळगाव : विधानसाभेचे सभापती आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी सकाळी साडे सात वाजता भाजपचे (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. भाजप किसान मोचार्चे प्रदेश सरचिटणीस कैलास सूर्यवंशी यांच्या आईचे निधन झाल्याने त्यांच्याही घरी जाऊन सात्वंनपर भेट दिली.
औरंगाबादहून अमळनेर व जळगाव येथे मंगळवारी होत असलेल्या बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी चाळीसगावमार्गे जात असताना हरिभाऊ बागडे यांनी सकाळी साडे सात वाजता जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी येथे जिल्हा बँकेचे संचालक राजेश राठोड, सतीष दराडे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, अरुण पाटील, मनोहर सूर्यवंशी, सुरेश परदेशी, भाऊसाहेब जगताप, डॉ. रमेश निकम, डॉ.एम.डी.पाटील, वाल्मिक पाटील आदींनी त्यांची भेट घेतली. डॉ. संजीव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
पक्ष संघटनात्मक पातळीवरही बागडे यांनी जिल्हाध्यक्ष डॉ. पाटील यांच्याशी चर्चा केली.
भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस, नवीदिल्ली कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सूर्यवंशी यांच्या आई गंगूबाई सूर्यवंशी यांचे ३१ आॅगस्ट रोजी निधन झाले. हारिभाऊ बागडे यांनी सूर्यवंशी यांच्या त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन आपल्या शोकसंवेदना प्रकट केल्या. तेथून ते खासगी कारने अमळनेरकडे रवाना झाले.

 

Web Title: Meeting of office bearers and workers at Chalisgaon

टॅग्स :Jalgaonजळगाव