ओबीसीची बांधवांची मुक्ताईनगर येथे बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:20 IST2021-09-22T04:20:31+5:302021-09-22T04:20:31+5:30

मुक्ताईनगर : येथील शासकीय विश्रामगृहात लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी बांधवांची बैठक झाली. ...

Meeting of OBC brothers at Muktainagar | ओबीसीची बांधवांची मुक्ताईनगर येथे बैठक

ओबीसीची बांधवांची मुक्ताईनगर येथे बैठक

मुक्ताईनगर : येथील शासकीय विश्रामगृहात लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी बांधवांची बैठक झाली. प्रमुख पाहुणे म्हणून इकरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष करीम सालार, जिल्हा बँक संचालक संजय पवार, अंजुमन तालीमुन मुस्लिमीनचे अध्यक्ष एजाज मलिक अध्यक्ष आदी उपस्थित होते.

ओबीसी आरक्षण हक्क परिषदेच्या माध्यमातून २५ रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात भव्य बैठक होणार असल्याचे प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.

याप्रसंगी मराठा समाजाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, दिनेश कदम, जळगाव जिल्हा मुस्लीम मानियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकिम आर. चौधरी, नगरसेवक शकील शेख, गोसावी समाजाचे ॲड.अरविंद गोसावी, तेली समाजाचे अतुल जावरे, मस्तान कुरेशी, आरीफ आझाद, आसिफ भाई, शकुर जमादार, जाफर अली, लुकमान बेपारी, अहमद ठेकेदार, सलीम खान आदी ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

Web Title: Meeting of OBC brothers at Muktainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.