भडगाव तालुक्यातील कजगावात सुरक्षेसाठी बँक व्यवस्थापकांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 15:42 IST2019-07-24T15:38:10+5:302019-07-24T15:42:28+5:30
भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी कजगाव येथील पोलीस मदत केंद्रात बँक शाखा व्यवस्थापकांची बैठक घेऊन बँक सुरक्षिततेविषयी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.

भडगाव तालुक्यातील कजगावात सुरक्षेसाठी बँक व्यवस्थापकांची बैठक
जगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी येथील पोलीस मदत केंद्रात बँक शाखा व्यवस्थापकांची बैठक घेऊन बँक सुरक्षिततेविषयी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.
गेल्या दोन महिन्यांत बँकेत झालेले चोरीचे प्रयत्न, फोडण्यात आलेले एटीएम हे सर्व प्रकार पहाता बँकेची सुरक्षा महत्वाची असल्याने बँकेत सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात यावी याबरोबरच बँकेत महत्वाच्या ठिकाणी पार्किंग व मुख्य रस्त्याच्या बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतच्या सूचना दिल्या.
याप्रसंगी सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक ऋषिकेश राजनीकर, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे समीर देसाई, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दिनकर पाटील, बुलढाणा अर्बन बँकेचे कृष्णा दानडे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.