शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने उद्धव ठाकरेंना फोन केला? प्रसाद लाड यांनी सगळंच सांगितलं
2
छगन भुजबळ कोणत्या पक्षात? जयंत पाटील म्हणाले,"उद्या निकालानंतर सांगतो...";
3
...तर मी स्वत:ला संपवून घेईन: सोनवणेंचा निवडणूक अधिकाऱ्याला इशारा; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
4
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
5
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
6
'भाजपाला चिंतनाची गरज' म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना महाजनांनी सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी सांगा..."
7
चोराचा अजब कारनामा; चोरी करायला घरात शिरला अन् AC च्या थंडाव्यात झोपी गेला, सकाळी...
8
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
9
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
10
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
11
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
12
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
13
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
14
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
15
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
16
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
17
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
18
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
19
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
20
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका

१ लाख कुटुंबांना होणार औषधींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 1:23 PM

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने एक लाख कुटुंबांना ‘आर्सेनिक अल्बम ३०’ या होमिओपॅथी औषधीचे वाटप ...

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने एक लाख कुटुंबांना ‘आर्सेनिक अल्बम ३०’ या होमिओपॅथी औषधीचे वाटप करण्यात येणार आहे. आतापर्यंत ५३ हजार बाटल्या तयार झाल्या. रविवारी दुसऱ्या टप्प्यात या औषधींचे अल्पबचत भवन येथे पॅकींग करण्यात आले असून यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी, एनएसएस, एनसीसी आणि विविध स्वयंसेवी संस्था प्रशासनाला मदत करीत असल्याची माहिती नोडल अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.या होमिओपॅथी औषधीचे पॅकिंगचा दुसरा टप्पा सुरू आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ५३ हजार बाटल्या तयार केल्या होत्या. दुसºया टप्प्यात १ लाख बाटल्यांचे पॅकींग करण्याचे उद्दीष्टे आहे. ही औषधे बॉटल्स मध्ये टाकून पॅकींग तयार करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि रेडक्रॉस अशा एकूण ७५ स्वयंसेवकांनी होमिओपॅथी औषधी तयार करण्यासाठी पुढाकार घेतला.यावेळी नोडल अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह रेडक्रॉस उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, प्रकल्प प्रमुख डॉ अपर्णा मकासरे, डॉ. रितेश पाटील स्वप्नील वाघ उपस्थित होते. या कार्यासाठी प्रा. दीपक सोनवणे, प्रा. योगेश महाले, प्रा. डॉ. मोहिनी उपासने, डॉ.योगेश बोरसे, आकाश धनगर, गौरव पाटील, रितेश चौधरी, जयेश साळुंके, संजीवनी साळवे, दुर्गादास माळी, रोहन अवचारे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर, युवक प्रतिनिधी चेतन वाणी, स्वयंसेवक भूषण लाडवंजारी, डॉ. विक्रांत जाधव, उज्ज्वल साळुंखे, शिरीष तायडे, आकाश धनगर, हेमंत मांडोळे, देवेंद्र लाडवंजारी, निवेदिता ताठे परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव