शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅपवर 'बाय' स्टेटस ठेवलं अन् गळफास घेवून जीवनयात्रा संपविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 22:42 IST

jalgaon: चिनावल (ता. रावेर) येथील मूळ रहिवासी असलेला अतुल पाटील हा मेहरूण परिसरातील जय भवानी कॉलनी येथे पत्नी वर्षा आणि अर्णव या दोन वर्षाच्या मुलासह वास्तव्यास होता.

जळगाव : बाय असे स्टेटस टाकत मेहरूण येथील अतुल रमेश पाटील (रा. जय भवानी कॉलनी, मेहरूण) या २६ वर्षीय तरूणाने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.चिनावल (ता. रावेर) येथील मूळ रहिवासी असलेला अतुल पाटील हा मेहरूण परिसरातील जय भवानी कॉलनी येथे पत्नी वर्षा आणि अर्णव या दोन वर्षाच्या मुलासह वास्तव्यास होता. सिंधी कॉलनीतील संत चोखामेळा वसतीगृहासमोर भक्ती नावाचे मेडीकल चालवून अतुल कुटूंबियांचा उदरनिर्वाह करायचा. दरम्यान, कौटुंबिक कारणामुळे दीड महिन्यापूर्वी पत्नी मुलाला घेवून माहेरी निघून गेली होती. त्यामुळे अतुल हा एकटाच होता. अखेर नैराश्यातून गुरूवारी मध्यरात्री त्याने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून जीवनयात्रा संपविली.मित्र घरी आल्यावर उघड झाला प्रकारदरम्याऩ अतुल पाटील याने आत्महत्या करण्यापूर्वी गुरूवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास आपल्या मोबाईलच्या व्हॉट्सअ‍ॅपच्या 'बाय' असे स्टेटस ठेवले होते. शुक्रवारी सकाळी मित्र आकाश मांडोळे हा घरी आल्यावर त्याला अतुलने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने लागलीच एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली.घटनास्थळी पोलिसांची धावमेहरूण परिसरात तरूणाने आत्महत्या केल्याचे कळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील यांच्यासह पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. नंतर मृतदेह हा जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. पुतण्याने आत्महत्या केल्याचे कळताच काका शांताराम माणिक पाटील यांनी सुध्दा रूग्णालयात धाव घेतली होती. याप्रकरणी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव