कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना व आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:25 IST2021-02-23T04:25:11+5:302021-02-23T04:25:11+5:30

- धार्मिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, दिंडी व तत्सम धार्मिक कार्यक्रमांना बंदी - धार्मिक स्थळे ही एका वेळेस केवळ ...

Measures and orders for corona control | कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना व आदेश

कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना व आदेश

- धार्मिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, दिंडी व तत्सम धार्मिक कार्यक्रमांना बंदी

- धार्मिक स्थळे ही एका वेळेस केवळ १० जणांच्या मर्यादेच्या उपस्थितीत पूजा-अर्चा या सारख्या विधीकरिता खुली राहतील.

- सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बगिचे, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील.

- सामाजिक, राजकीय, मनोरंजनात्मक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी तसेच क्रीडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने यांना बंदी

- कायद्यानुसार बंधनकारक असणाऱ्या वैधानिक सभांना केवळ ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादेत परवानगी राहील. तथापी, याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांना सूचित करणे आवश्यक राहणार आहे. मात्र जिल्हा परिषद सर्व साधारण सभा व जळगाव शहर महानगरपालिका सर्वसाधारण सभा यांना उपस्थितीच्या संख्येच्या मर्यादेतून सूट राहणार आहे.

- सर्व प्रकारच्या खासगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणे, त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर याबाबींचे पालन करून घेणे बंधनकारक राहणार आहेत. तसेच कोरोनाची लक्षणे असणाऱ्या संशयित कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून घेण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांवर राहणार आहे.

Web Title: Measures and orders for corona control