महापौर-उपमहापौर निवडी वादात, तरीही प्रवेशद्वाराजवळ विजयाचे बॅनर झळकले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 12:06 PM2021-03-18T12:06:50+5:302021-03-18T12:07:39+5:30

गटनेते भगत बालानी यांनी देखील आक्षेप घेतला असून महापौर उपमहापौरपदाची निवडणूक ऑनलाइन घेण्यात येऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे.

In the mayoral-deputy mayoral election controversy, victory banners flashed near the entrance | महापौर-उपमहापौर निवडी वादात, तरीही प्रवेशद्वाराजवळ विजयाचे बॅनर झळकले

महापौर-उपमहापौर निवडी वादात, तरीही प्रवेशद्वाराजवळ विजयाचे बॅनर झळकले

googlenewsNext
ठळक मुद्देजळगाव महापालिकेत भाजप व शिवसेना-भाजप बंडखोर अशी लढत आहे. भाजपकडून प्रतिभा कापसे या महापौर तर सुरेश सोनवणे उप महापौर पदाचे उमेदवार आहेत.

जळगाव - महापालिका महापौर उपमहापौर निवडणुकीला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली आहे. मात्र, सुरुवातीपासूनही ही निवड प्रकिया वादाचा मुद्दा ठरताना दिसत आहे.  महापौर-उपमहापौर यांच्या अर्जावर भाजपाकडून आक्षेप घेण्यात आल असून दोन्ही उमेदवारांचा सूचक अनुमोदक यांचे नाव राज पत्राचा नियमानुसार नसल्याचा दावा भाजपने केलाय. ऍड. शुचिता हाडा यांनी याबाबतचा आक्षेप घेत स्वाक्षरी मध्ये तफावत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. 

गटनेते भगत बालानी यांनी देखील आक्षेप घेतला असून महापौर उपमहापौरपदाची निवडणूक ऑनलाइन घेण्यात येऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच ही बेकायदेशीर प्रक्रिया असून, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यांचा आक्षेप फेटाळून लावला आहे. ऍडव्होकेट हाडा यांचा आक्षेप फेटाळण्यात आल्याने त्यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. 

जळगाव महापालिकेत भाजप व शिवसेना-भाजप बंडखोर अशी लढत आहे. भाजपकडून प्रतिभा कापसे या महापौर तर सुरेश सोनवणे उप महापौर पदाचे उमेदवार आहेत. शिवसेनेकडून जयश्री महाजन या महापौर तर भाजप बंडखोर कुलभूषण पाटील हे उप महापौर पदाचे उमेदवार आहेत. त्यासाठी, सध्या ऑनलाईन सभा होत आहे. सेना व भाजप बंडखोर हे ठाण्यात असून पत्रकारांना सभेत मनाई करण्यात आली आहे.

जयश्री महाजनांच्या अर्जाला भाजपकडून हरकत
 
शहर मनपाच्या महापौर आणि उपमहापौर निवडीला प्रारंभ झाला असून उमेदवारांचे अर्ज वाचून दाखवले जात आहे. शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार जयश्री महाजन यांचा अर्ज वाचून दाखविल्यानंतर सूचक आणि अनुमोदक असलेले नितीन लढ्ढा आणि प्रशांत नाईक यांचे नाव गॅझेटनुसार नसल्याचे सांगत भाजपच्या नगरसेविका ऍड.शुचिता हाडा यांनी त्यावर हरकत घेतली आहे. पिठासन अधिकाऱ्यांना हरकत नोंद करण्याचे त्यांनी सांगितले आहे.

निवडीपूर्वीच मनपाच्या प्रवेशद्वाराजवळ लागले विजयाचे बॅनर

मनपाच्या महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया सभागृहात सुरू असून निवड होण्यापूर्वीच शिवसेनेच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी विजयाचे फलक लावले आहे. मनपाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शिवसेना कार्यकर्ते विराज कावडिया यांनी जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांच्या निवडीचे फलक लावले आहे. भगवा फडकला अशा शब्दात असलेले फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

मतदान प्रक्रिया थांबवण्याची मागणी
भाजपच्या अनेक नगरसेविका यांना ऑनलाईन सभेतून लेफ्ट करण्यात आल्याने, मतदान प्रक्रिया थांबवण्याची मागणी भाजपचा सदस्यांकडून केली जात आहे.

Web Title: In the mayoral-deputy mayoral election controversy, victory banners flashed near the entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.