जळगावचे महापौर भाजपात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 12:48 IST2018-07-09T12:43:43+5:302018-07-09T12:48:02+5:30
१० दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश

जळगावचे महापौर भाजपात दाखल
जळगाव- १० दिवसांपूर्वी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत प्रवेश केलेले महापौर ललित कोल्हे हे रविवारी रात्री जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे अन्य पाच व राष्टÑवादी काँग्रेसच्या नगरसेविका कंचन सनकत यांनीही भाजपात प्रवेश केला.
कोल्हे यांच्यासह मनसेचे नगरसेवक संतोष पाटील, नगरसेविका खुशबु बनसोडे व पद्माबाई सोनवणे यांनी देखील भाजपात प्रवेश केला. तसेच ललित कोल्हे यांचे वडिल नगरसेवक विजय कोल्हे व आई सिंधूताई कोल्हे यांनी देखील भाजपात प्रवेश केल्याची माहिती कोल्हे यांनी दिली. राष्टÑवादीच्या नगरसेविका कंचन सनकत यांनी देखील रविवारी दुपारी भाजपामध्ये प्रवेश केला. महापौरांना भाजपाकडे खेचण्यासाठी शहरात दिवसभर बैठकींचे सत्र सुरु होते. अखेर रात्री ८ वाजता त्यांचा प्रवेश झाला. कोल्हे हे आपल्या महापौरपदाचा राजीनामा मनपा आयुक्तांकडे सादर करणार आहेत.