महापौर व उपमहापौरांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:14 IST2021-04-15T04:14:57+5:302021-04-15T04:14:57+5:30

जळगाव : विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले आहे. जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या संविधानाला अनुसरून कोरोनाला अटकाव ...

From the Mayor and Deputy Mayor, Dr. Greetings to Babasaheb Ambedkar | महापौर व उपमहापौरांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महापौर व उपमहापौरांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

जळगाव : विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले आहे. जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या संविधानाला अनुसरून कोरोनाला अटकाव करण्यासाठी शासन, प्रशासन वेळोवेळी नियम लागू करत असतात. प्रत्येक जळगावकराने संविधान आचरणात आणून या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी रेल्वे स्थानकाबाहेरील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले की, आपण सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आचरणात आणून नियमांचे पालन करावे तसेच सध्या कोरोनाचा हाहाकार असल्याने शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन करावे आणि कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, नगरसेवक चेतन सनकत, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, अनिल अडकमोल, अजय घेगट व मनपा अधिकारी आणि समाजबांधव, नागरिक उपस्थित होते.

Web Title: From the Mayor and Deputy Mayor, Dr. Greetings to Babasaheb Ambedkar