माथेफिरूचा झाडावर चढून धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST2021-06-26T04:13:33+5:302021-06-26T04:13:33+5:30

जळगाव : माथेफिरू तरुणाने एका झाडावर चढून तब्बल दीड तास धिंगाणा घातल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री एसटी वर्कशॉपच्या मागील ...

Mathephiru climbed the tree and sighed | माथेफिरूचा झाडावर चढून धिंगाणा

माथेफिरूचा झाडावर चढून धिंगाणा

जळगाव : माथेफिरू तरुणाने एका झाडावर चढून तब्बल दीड तास धिंगाणा घातल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री एसटी वर्कशॉपच्या मागील बाजूस घडला. या प्रकारामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झालेली होती.

महामंडळाच्या एसटी वर्क शॉपच्या मागील बाजूस असलेल्या एका झाडावर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास माथेफिरू तरुण झाडावर चढला होता. जोरजोरात आरोळ्या मारून धिंगाणा घालत असल्यामुळे हा प्रकार परिसरातील नागरिकांना लक्षात आला. त्यांनी एमआयडीसी पोलिसांना संपर्क साधून संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांनी क्षणाचा विलंब न करता घटनास्थळ गाठले. नंतर त्यास खाली उतरविण्यासाठी विविध प्रलोभने दाखविण्यात आली. मात्र, तरीसुदेखील तो झाडावरून खाली उतरण्यास तयार नव्हता. या प्रकारामुळे घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. तासाभरापासून सुरू असलेले नाट्य पाहून एमआयडीसी पोलिसांनी अखेर अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने पोलिसांनी माथेफिरूला खाली उतरविले व नंतर पोलीस ठाण्यात नेले.

Web Title: Mathephiru climbed the tree and sighed