शौचालयात लपवून ठेवलेले साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 13:05 IST2020-05-10T13:04:32+5:302020-05-10T13:05:14+5:30
हॉकर्सवर केली कारवाई

शौचालयात लपवून ठेवलेले साहित्य जप्त
जळगाव : फुले मार्केटमध्ये सार्वजनिक शौचालयात लपवून ठेवलेले साहित्य शनिवारी जप्त करण्यात आले. या ठिकाणी काही हॉकर्सनी दुकाने थाटली असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तेथे हॉकर्सनी रेडीमेड कपडे व अन्य साहित्य जमा केले.
महात्मा फुले मार्केट बंद असले तरी त्याठिकाणी काही हॉकर्स रेडीमेड कपडे, किरकोळ साहित्य विक्रीसाठी दुकान थाटले असल्याची माहिती मिळाल्यानंतर संतोष वाहुळे यांनी लागलीच फुले मार्केटमध्ये जाऊन पाहणी केली. उपायुक्त येताच हॉकर्सची पळापळ सुरु झाली. हॉकर्सनी आपले साहित्य जमा करुन फुले मार्केटमध्ये असलेल्या सार्वजनिक शौचालयात ठेवले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या पथकाने सर्व साहित्य जप्त केले. यावेळी उपायुक्त वाहुळे यांच्यासह अतिक्रमण अधीक्षक एच.एम. खान व पथक उपस्थित होते.
टरबूज विक्रेत्याला हजार रुपये दंड
विक्रेत्यांना सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र काही विक्रेत्यांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. शनिवारी नुतन मराठा महाविद्यालयासमोर टरबूज विक्रेत्याकडे ग्राहकांची गर्दी दिसून आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न क रण्याच्या कारणावरुन उपायुक्त संतोष वाहुळे यांनी टरबूज विक्रेत्याला एक हजार रुपय दंड केला.