Independence Day : जळगावात भव्य मशाल रॅलीने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:21 IST2018-08-15T00:18:18+5:302018-08-15T00:21:55+5:30
स्वराज्य निर्माण सेनेतर्फे आयोजन

Independence Day : जळगावात भव्य मशाल रॅलीने वेधले लक्ष
जळगाव : स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वराज्य निर्माण सेनातर्फे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला मंगळवारी रात्री ९ वाजता स्वातंत्र्य चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला अभिवादन करुन मशाल रॅली काढण्यात आली. आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश भोळे यांनीदेखील हातात मशाल घेऊन रॅलीमध्ये सहभाग घेतला.
रॅलीमध्ये सुमारे शंभराहून अधिक तरुणांनी सहभाग घेऊन, हातामध्ये घेतलेल्या मशाल रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
मशाल रॅली यशस्वी करण्यासाठी स्वराज्य निर्माण सेनेचे ललित सोनवणे, परेश शिनकर, रितेश बागुल, सागर सोनवणे, सुनील इंगळे आदींनी परिश्रम घेतले.
छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
या रॅलीत बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, युवाशक्ती फाउंडेशन,शिवसेना, भाजपा यासह शहरातील युवकांनीदेखील सहभाग घेतला होता. स्वातंत्र्य चौकातून बस स्थानकमार्गे ही मशाल रॅली शिवतीर्थ मैदानावर पोहचली. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याला अभिवादन करुन, रॅलीचा समारोप करण्यात आला.