शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

भुसावळ एमआयडीसीत भीषण आग, तीन कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 16:10 IST

दोन वाहने व इतर साहित्य जळून खाक

भुसावळ : तालुक्यातील खडका येथील एमआयडीसीमधील डिस्को एंटरप्राईजेस कंपनीला भिषण आग लागल्यामुळे सुमारे तीन कोटींचे नुकसान झाले. ही घटना रविवारी २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशमन दलाचे पाच बंब व खाजगी टँकरने जवळपास चार तास प्रयत्न केले.या घटनेबाबत वृत्त असे की, खडका एमआयडीसीमध्ये डिस्को इंटरप्राईजेस या कंपनीच्या परिसरात काही व्यक्तींनी वाळलेले गवत पेटविले होते. मात्र या गवताने लगेच आगीचे रुद्र रुप धारण केले. आग कंपनीत शिरली व कंपनीतील टीव्ही, खुच्या व फ्रीजचे स्टँड बनवीन्याचे मशीन आगीच्या भक्षस्थानी पडले. सुदैवाने लॉकडाऊन व संचारबंदीमुळे सदर कंपनी बंद होती. त्यामुळे कंपनी कामगार नसले तरी एकच वाचमन उपस्थित होता. त्यांने आगीसंदर्भात कंपनीचे मालक कन्हैयालाल मिलकीराम मकडिया यांना फोनवरुन माहिती दिली. त्यामुळे मालक व परिवारीतल सदस्य घटनास्थळी पोहचले.दरम्यान धुराचे लोट मोठे असल्यामुळे दूरुनच आग लागल्याचे दिसून येत होते. खडका येथील पोलीस पाटील सुरतसिंग पाटील यांनी तालुका पोलिस स्टेशन व भुसावळ न.पा.च्या अग्नीशमन दलाला माहिती दिली व तेही घटनास्थळी पोहचले. त्यामुळे न.पा. अग्नीशमन दलाचे दोन, आयुध निर्माणी भुसावळ, दीपनगर व जामनेर नगर पालिका असे प्रत्येकी एक असे एकुण पाच बंब व सहा टँकर घटनास्थळी दाखल झाले. टँकर व बंब भरण्यासाठी परिसरातील सोहम पेपर मील व एस.पी. इंटरप्राईजेस येथून पाणी वाहण्यात येवून बंब भरुन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तब्बल चार तास प्रयत्न करण्यात आले. परिसरात पाणी जवळच उपलब्ध असल्यामुळे जवळच्या कंपनी किंवा गोडाऊनकडे आगीचा फैलाव झाला नाही. यामुळे इतर कंपन्यांचेही नुकसान झाले नाही.दरम्यान, आ. संजय सावकारे यांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. ते येथे अडीच ते तीन तास थांबून होते. डीवायएसपी गजानन राठोड , पं.स.चे माजी सभापती सुनील महाजन, माजी उपसभापती मुरलीधर (गोलू) पाटील, तहसीदार दीपक धिवरे, तलाठी मिलिंद देवरे, तालुका पो.स्टे.चे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,स.पो.नि. अमोल पवार, पो.कॉं.विठ्ठल फुसे, अजय माळी हे देखील घटनास्थळी दाखल झाले. तर बाजारपेठ पोलिसांनीही आगीची भिषणता पाहुन घटनास्थळी भेट दिली.दोन वाहने जळाली लाया आगीत एक आयशर जळून खाक तर एका मालवाहतूक वाहनाचा काही भाग जळाला तर टीव्ही, खुर्च्या, फ्रिज स्टँड बनविण्याची मशीनरी व शेड जळून खाक झाल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पंचनाना केल्यांनतर नुकसानीचा आकडा समजू शकेल. तालुका पोलिसात याबाबत मकडीया यांच्या फिर्यादी नंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.धुरांच्या लोटमुळे ग्रामीण भागात चर्चाकंपनीला लागलेली आग इतकी भिषण होती की, भुसावळसह तालुक्यातील कुºहे (पानाचे), चोरवड, गोजोरा, कन्हाळे, किन्ही, साक्री गावात धुराचे लोट दिसत होते. त्यामुळ ग्रामीण भागातही चर्चा सुरू होती.