शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

हिवाळी परीक्षेतील ५४ हजार विद्यार्थ्यांची गुणपत्रके ‘डिजिलॉकर’वर अपलोड

By अमित महाबळ | Updated: May 27, 2023 19:45 IST

ही संख्या महाराष्ट्र राज्य अकृषी विद्यापीठांमध्ये सर्वोच्च ठरली आहे.

अमित महाबळ, जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ५४ हजार २२२ विद्यार्थ्यांची डिसेंबर, २०२२ परीक्षेची गुणपत्रके डिजिलॉकरच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. आजपर्यंतच्या आकडेवारीत ही संख्या महाराष्ट्र राज्य अकृषी विद्यापीठांमध्ये सर्वोच्च ठरली आहे.

विद्यापीठाने डिजिलॉकरवर अपलोड केलेल्या गुणपत्रिकांमध्ये डिसेंबर २०२२ च्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.सी.ए. प्रथम वर्ष आणि बी. टेक. हे पदवी अभ्यासक्रम तसेच एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी., एम.बी.ए., एम.सी.ए. या पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या परीक्षांचा निकाल जाहीर झालेल्या १ लाख १७ हजार विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकांपैकी ५४ हजार २२२ विद्यार्थ्यांचे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचा एबीसी आयडी व विद्यार्थ्यांनी दिलेला आधार जुळत असल्याने या विद्यार्थ्यांचे क्रेडिट ट्रान्सफर झाले आहेत. उर्वरित ६२ हजार ७७८ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे संकेतस्थळ nmuj.digitaluniversity.ac यावर ई-सुविधा, स्टुडंट प्रोफाइलमध्ये लॉगीन करून एबीसी आयडीद्वारे आधारकार्ड नंबर अपडेट करावा. जेणेकरून त्यांचीही गुणपत्रके डिजिलॉकरमध्ये (www.digilocker.gov.in) दिसू शकतील. एम.के.सी.एल.चे अमोल पाटील यांनी ही कार्यवाही परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र. संचालक यांच्या निर्देशान्वये केली आहे.

आतापर्यंत पदवी प्रमाणपत्रे अपलोड केली जायची. विद्यापीठात १९९४ पासूनच्या साडेपाच लाख पदवी आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार गुणपत्रके डिजिलॉकरवर अपलोड करायची आहेत. डिसेंबर, २०२२ परीक्षेच्या निकालापासून याची सुरुवात झाली आहे. तीन महिन्यांपासून हे काम सुरू होते. उन्हाळी परीक्षांचा निकाल जाहीर होताच पुढील एक महिन्यात तीही गुणपत्रके अपलोड केली जातील. विद्यापीठाने विद्यार्थी हितासाठी हे मोठे पाऊल उचलले आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम, क्रेडिट पॉइंट एकसमान असतील. त्या दृष्टीने भविष्यात गुणपत्रिकेत बदल केले जातील, अशी माहिती कबचौउमविचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगावuniversityविद्यापीठEducationशिक्षण