शिरसोली येथे विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 20:01 IST2018-08-27T20:00:05+5:302018-08-27T20:01:50+5:30
मुलीला किराणा दुकानावर पाठवून सोनल विलास माळी (वय २८, मुळ रा.लोंढीपुरा, ता.पाचोरा) या विवाहितेने शिरसोली प्र.न.येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी साडे दहा वाजता घडली.

शिरसोली येथे विवाहितेची आत्महत्या
जळगाव : मुलीला किराणा दुकानावर पाठवून सोनल विलास माळी (वय २८, मुळ रा.लोंढीपुरा, ता.पाचोरा) या विवाहितेने शिरसोली प्र.न.येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी साडे दहा वाजता घडली. घटनेचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सोनल माळी यांनी मुलगी प्राची हिला किराणा दुकानावर पाठविले. त्यानंतर राहत्या घरात झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगी थोड्यावेळाने परत आली तेव्हा दरवाजाची कडी आतून बंद होती. आवाज देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने प्राची हिने शेजारील महिलांना सांगितले. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता सोनल यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.