आसोदा येथे विवाहितेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:11 IST2021-05-03T04:11:10+5:302021-05-03T04:11:10+5:30

जळगाव : तालुक्यातील असोदा येथील एका २० वर्षीय विवाहितेचा पदर ओढून विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भूषण ...

Marital molestation at Asoda | आसोदा येथे विवाहितेचा विनयभंग

आसोदा येथे विवाहितेचा विनयभंग

जळगाव : तालुक्यातील असोदा येथील एका २० वर्षीय विवाहितेचा पदर ओढून विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भूषण प्रभाकर निंबाळकर या तरुणाला तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील आसोदा येथील २० वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबीयांसह राहते. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त किराणा दुकानावर आल्या होत्या. त्यावेळी संशयित आरोपी भूषण प्रभाकर निंबाळकर याने विवाहितेचा साडीचा पदर ओढून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होता, पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय चौधरी यांनी संशयित आरोपी निंबाळकर याला शनिवारी रात्री अटक केली आहे.

Web Title: Marital molestation at Asoda