फुलांचे असे वधारले दर (प्रति किलो)
फुलांचे प्रकार-गेल्या आठवड्यातील भाव-सध्याचे भाव
निशिगंध - २०० - ६००
अष्टर - ६० ते ८० - १०० ते १५०
झेंडू - ४० ते ५० - ६० ते ८०
कमळ - १० - ५० (प्रति नग)
काय म्हणतात विक्रेते
पावसामुळे फुलांच्या दर्जावर परिणाम झाला असून त्यांची आवक घटली आहे. त्यात गौरी-गणपती उत्सवामुळे मागणी वाढल्याने सर्वच फुलांचे भाव वधारले आहेत.
- योगेश काळुंखे, फूल विक्रेते
काय म्हणतात भक्त
सध्या महागाई सर्वच क्षेत्रात वाढत आहे. त्यात आता भक्तीभावाचा महिमा असलेल्या गौरी-गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या फुलांचेही भाव वाढल्याने आर्थिक भार वाढला आहे.
- सुजाता जाधव.
गणेश चतुर्थीला झेंडूची फुले १०० रुपये प्रति किलोने घ्यावी लागली. त्यात आता गौरी उत्सवासाठी लागणारे निशिगंधाचे फूलदेखील थेट ६०० रुपयांवर पोहोचल्याने गणित कोलमडत आहे. मात्र हे सण वर्षातून एकदाच येतात, त्यामुळे अशा ठिकाणी खर्चाचा फारसा विचार होत नाही.
- स्नेहलता बडगुजर.