शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

विवाहितेने अनेकांना फसवल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 01:06 IST

पोलिसांनी बोरगावच्या पतीची तक्रार घेऊन तरुणीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

ठळक मुद्देवृत्त झळकताच पहिला पती हजरधरणगावात गुन्हा दाखल

धरणगाव, जि.जळगाव : तालुक्यातील बोरगाव येथे तीन दिवसांपूर्वीच नागपूरच्या एका मुलीशी तेथील रवींंद्र सुरेश पाटील या शेतमजूर मुलाशी लग्न झाले होते. मात्र तीन दिवसातच या नववधूने सासर असलेल्या बोरगावमधून काढता पाय घेऊन एरंडोल गाठले. तू एकटी जाऊ नको म्हणत ग्रामस्थांनी तिला रोखले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्तावरून खळबळ उडाली. या मुलीशी तर आपले महिन्यापूर्वी लग्न झाले होते, असे म्हणत धरणगावमधील पहिला पतीही पोलिसात हजर झाल्याने या घटनेची गुंतागुंत वाढली. नागपूरच्या या तरुणीची ही कहाणी ऐकून सर्वच अवाक् झाले.दरम्यान, पोलिसांनी बोरगावच्या पतीची तक्रार घेऊन तरुणीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणातील तिचे नातेवाईक (दलाल) तिचे तिसरे लग्न या आठवड्यात चाळीसगावातील मुलाशी लावून देणार होते, असे खुद्द तिने सांगितले.रवींंद्र सुरेश पाटील (रा.बोरगाव) याच्याशी आंचल अजयराव देशमुख हिचे लग्न तीन दिवसांपूर्वीच राजू भोपचे, अंकुश पटले, निशांत पटले व ललित पटले (सर्व रा.नागपूर) यांच्या मध्यस्थीने बोरगावच्या विठ्ठल मंदिरात झाले होते. सुशिक्षित असलेल्या संगीताचे खेडेगावात चित्त लागत नसल्याचे म्हणणे आहे. मला बोरगावला काही एक त्रास झालेला नाही. मात्र मला येथे राहायची इच्छा नाही, असे ती म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर कुठलाच तणाव जाणवत नव्हता. सर्वांना ती रोखठोक उत्तर देत होती.ग्रामस्थ पोलिसात दाखलसामाजिक कार्यकर्त्या जनाबाई पाटील, स्वप्नील पाटील, उपसरपंच भालचंद्र मुन्ना पाटील, पोलीस पाटील लखीचंद पाटील, गोविंद पाटील, अतुल सोनवणे, नंदू पाटील, नासिर पठाण, विकी पाटील, निंबा कंखरे आदी १०० ग्रामस्थांनी २८ रोजी सकाळी धरणगाव पोलीस स्टेशन गाठून सपोनि पवन देसले यांना भेटून घडलेला प्रकार कथन केला.लग्नानंतर एका तासात पोबारासुभाष श्रीधर वाघ (रा.हमालवाडा, धरणगाव) यांचा मुलगा सचिन याच्याशी आचलचे ३ आॅगस्ट रोजी तिच्या नातेवाईकांच्या मध्यस्थीने लग्न झाले होते. मात्र तिने लग्नानंतर एका तासात घरातून पोबारा केला होता. असे तिचा पहिला पती सचिनने सांगितले.आचलला पोलिसांनी घेतले ताब्यातया घटनेसंदर्भात रवींद्र सुरेश पाटील (रा.बोरगाव) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तीन दिवसांपूर्वी माझे व आचलचे लग्न झाले. मला लग्नाला पन्नास हजार रुपये खर्च आला आहे. या स्थितीत ती चित्त लागत नसल्याचे कारण सांगून माझ्यासोबत राहत नाही. तसेच तिचे सचिन सुभाष वाघ, रा.हमालवाडा, धरणगाव यांच्याशी पहिले लग्न झालेले असताना तिने माझ्यासोबत लग्न करुन माझी फसवणूक केली आहे. यावरून आचल देशमुख रा.वॉर्ड क्र.३, लता मंगेशकर रोड, भीमनगर, इमासनी सीआरपीएफ, नागपूर हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले आहे. तपास सपोनि पवन देसले करीत आहेत.या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी लग्नासाठी मध्यस्थी करणाºया आचलच्या नातेवाईकांचा शोध घेणे आवश्यक असून, त्यांनी अशा अनेकांना फसविल्याचा दाट संशय आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDharangaonधरणगाव