जळगाव : मनपा निवडणुकीसाठी भाजपाने अत्यंत नियोजनपूर्वक प्रचाराचे काम सुरु केले आहे. अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून उमेदवारांना मार्गदर्शन व मदत मिळाल्याने एकाही उमेदवाराच्या अर्जात त्रुटी राहिली नाही. आता प्रचार यंत्रणाही जोमाने सुरु असून या यंत्रणेत पडद्यामागचे अर्थात कार्यालयातून कामकाज सांभाळणारे पदाधिकारी व कार्यकर्ते हे सुद्धा महत्वाची भूमिका पार पाडत आहेत.संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी आणि महेश जोशी यांच्यावर सर्व उमेदवारांसाठी समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे दोघे पदाधिकारी प्रत्येक प्रभागातील उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. त्यांना पक्षाचा संदेश तसेच त्यांचा संदेश पक्ष पदाधिकाºयांपर्यंत पोहचवून पक्षाला अपेक्षित काम होते आहे की, नाही ? यावर ते लक्ष ठेवून आहेत.याचबरोबर कामे सोपी व नेटकी व्हावी यासाठी प्रचार व प्रसिद्धी, सोशल मिडिया तसेच जाहीरनामा प्रमुख, निवास व भोजन व्यवस्था, टेंट व साउंड व्यवस्था, हिशोब तपासनीस, प्रचार साहित्य प्रमुख, परवानगी, वाहन व्यवस्था, सभा व्यवस्था महिला व्यवस्था आदी विविध जबाबदाºया स्वतंत्रपणे सोपविण्यात आल्या आहेत.
जळगावात भाजपाच्या प्रचार यंत्रणेत पडद्यामागे अनेक पदाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 15:37 IST
जळगाव : मनपा निवडणुकीसाठी भाजपाने अत्यंत नियोजनपूर्वक प्रचाराचे काम सुरु केले आहे. अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून उमेदवारांना मार्गदर्शन व मदत मिळाल्याने एकाही उमेदवाराच्या अर्जात त्रुटी राहिली नाही. आता प्रचार यंत्रणाही जोमाने सुरु असून या यंत्रणेत पडद्यामागचे अर्थात कार्यालयातून कामकाज सांभाळणारे पदाधिकारी व कार्यकर्ते हे सुद्धा महत्वाची भूमिका पार पाडत ...
जळगावात भाजपाच्या प्रचार यंत्रणेत पडद्यामागे अनेक पदाधिकारी
ठळक मुद्दे‘बॅक’ आॅफीसची यंत्रणा सज्जविशाल त्रिपाठी व महेश जोशी यांच्या समन्वयाची जबाबदारीविविध जबाबदाऱ्या पार पाडल्या जाताय कार्यालयातून