१४ लिपिकांच्या बदल्यांमुळे मनपात नवा वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 09:20 PM2019-11-21T21:20:23+5:302019-11-21T21:20:34+5:30

जळगाव : मनपाच्या विविध विभागातील १४ लिपीकांच्या बुधवारी मनपा उपायुक्त अजित मुठे यांनी बदल्या केल्या. या बदल्यांमुळे मनपात नवा ...

मन New controversy in mind due to clerical transfers | १४ लिपिकांच्या बदल्यांमुळे मनपात नवा वादंग

१४ लिपिकांच्या बदल्यांमुळे मनपात नवा वादंग

Next

जळगाव : मनपाच्या विविध विभागातील १४ लिपीकांच्या बुधवारी मनपा उपायुक्त अजित मुठे यांनी बदल्या केल्या. या बदल्यांमुळे मनपात नवा वादंग उठला आहे. प्रभाग समिती एक मधील संगणक विभागातील पाच लिपीकांच्याही यामध्ये बदल्या झाल्या आहेत. विश्वासात न घेताच या बदल्या केल्यामुळे विभागप्रमुखांनी नाराजी व्यक्त केली.
मनपाच्या वेगवेगळ्या विभागातील १४ लिपिकांच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. यात प्रभाग समिती क्रमांक१ मधील सबोध तायडे,समाधान चौधरी,अंकुश गवई,संतोष कोल्हे,भोजराज काकडे,प्रभाग समिती क्रमांक २ मधील संजय खडके,नरेंद्र कोळी, प्रभाग समिती क्रमांक ३ मधील नितीन जैन, प्रभाग समिती क्रमांक ४ मधील विलास माळी,राहुल पवार,आस्थापना विभागातील खादीक इकबाल, भानुदास वानखेडे, अर्थ विभागातील किशोर अटवाल,मलेरिया विभागातील वाहन चालक साहेबराव शंखपाळ या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
बदली रद्द करण्याची मागणी करणार
प्रभाग समिती १ मधील बदली करण्यात आलेले कर्मचारी या संगणकाच्या कामकाजात पारंगत होते. वसुली करताना त्यांची चांगली मदत होत होती. मात्र, वसुलीच्या काळातच त्यांची बदली झाल्याने नव्याने आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा नवीन सुरुवात करावी लागेल त्यामुळे कामकाजावर परिणाम होईल असे मत या विभागातील अधिकाºयांनी व्यक्त केले आहे. मनपा उपायुक्त उत्क र्ष गुट्टे यांनी याबाबत आयुक्तांशी चर्चा करून बदली रद्द करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिंती दिली.
बदली रद्द करण्यास दबाव आणल्यास कारवाई करणार
उपायुक्त अजित मुठे यांनी काढलेल्या आदेशात म्हटल्याप्रमाणे बदल्यांचे आदेश मिळाल्यानंतर तात्काळ संबंधित विभागातून कार्यमुक्त करण्यात यावे.तसेच बदलीच्या ठिकाणी रुजू होवून अहवाल सादर करावा असेही उपायुक्त मुठे यांनी आदेशात म्हटले आहे. कोणत्याही कर्मचाºयाने बदली रद्द करण्यास दबाव आणल्यास कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे आता आयुक्त याबाबत काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: मन New controversy in mind due to clerical transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.