Make yourself aware by keeping curiosity awake | कुतुहल जागृत ठेवून स्वत:ला घडवा
कुतुहल जागृत ठेवून स्वत:ला घडवा

जळगाव : मी तज्ज्ञ वगैरे काही नाही. अजूनही स्वत:ला विद्यार्थीच समजतो. आजच्या शिक्षणात शिक्षकसुध्दा विद्यार्थी राहिलेले नाहीत. कारण कुतुहलच संपून गेलं. आपल्यातील कुतुहल आपण मारून टाकतो, त्यामुळे आपण कसेबसे आयुष्य जगत आहोत, अशा शब्दात ज्येष्ठ लेखक, आयटी तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी ‘मी कसा घडलो?’ या विषयावर मार्गदर्शन केले.
नोबेल व भरारी फाऊंडेशनतर्फे ‘मी कसा घडलो?’ या विषयावर गोडबोले यांचे व्याख्यान झाले. उद्योजक रजनीकांत कोठारी, जळगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, नंदलाल गादीया, सपन झुनझुनवाला, भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी, एस. जे. पाटील, सा.बां. विभागाचे डेप्युटी इंजिनिअर सुभाष राऊत, संजय शेखावत आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. नरसिंग परदेशी-बघेल लिखित ‘मध्ययुगीन भारतातील बिकानेर-महाराष्ट्र संबंध’, डॉ. युवराज परदेशी लिखीत ‘आऊट आॅफ बॉक्स’, प्रियंका पाटील लिखित ‘कलामांचे विचारधन’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन नोबेल फाऊंडेशनचे अध्यक्ष जयदीप पाटील यांनी केले. नंदूरबारमधील शहादा येथे आदिवासींच्या हक्काबाबत आंदोलन करताना आपणास १० दिवस करागृहात पाठविण्यात आले. तिथे एका बाजूला २ खून केलेले आरोपी होते, दुसऱ्या बाजूला ३ खून केलेले आरोपी. मी त्यावेळी खून केलेल्या एकूण १२ जणांच्या मुलाखती घेऊन त्यांचं आयुष्य, मानसिकता समजून घेतली. त्यावेळी एकाने खिसा सहा तºहेने कसा कापता येतो, हे दाखवले. आता मला त्यात करिअर करायचे नव्हते, म्हणून लक्ष दिले नाही, असे सांगताच हशा पिकला.
४आयआयटीमध्ये असताना माझ्या इंग्रजी बोलण्यावरून मला हिणवले गेले. त्याचा मला प्रचंड राग आला आणि पुढचे सहा महिने मी इंग्रजी शिकण्यावरच भर दिला. अनेकजण इंग्रजी शब्द पाठ करतात आणि बोलताना भाषांतर करून बोलतात. मी तसं केलं नाही, माझे विचार मी इंग्रजीतूनच मांडायला सुरुवात केली.त्यामुळे इंग्रजी पक्के झाले. मी पुढे टोकियो, न्यूयार्क, लंडनमध्ये व्याख्याने दिली. टोकियोतील एका कार्यक्रमाचे जगभरात प्रसारण होणार होते. त्या कार्यक्रमाच्या दुसºया दिवशी न्यूयॉर्कमधील एका वृत्तपत्रात माझ्या त्या कार्यक्रमाची मोठी बातमी छापून आली होती, हे सगळं माझ्यातील ‘मी’पणा गळून पडल्याने आणि कुतुहल जागृत ठेवल्याने झालं, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पहिल्या नोकरीपासून आपला प्रवास खुमासदार शैलीत उलगडला.

Web Title:  Make yourself aware by keeping curiosity awake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.