पिंप्राळा भागात मनपा रुग्णालय करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:16 IST2021-04-09T04:16:49+5:302021-04-09T04:16:49+5:30
अखेर जयकिसन वाडीतील कचरा वॉटरग्रेस ने उचलला जळगाव - राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी मंगळवारी शहरातील जय किसन ...

पिंप्राळा भागात मनपा रुग्णालय करा
अखेर जयकिसन वाडीतील कचरा वॉटरग्रेस ने उचलला
जळगाव - राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी मंगळवारी शहरातील जय किसन वाडी भागातील कचऱ्याचा ढीग बाबत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत मनपा आयुक्तांनी सफाई ठेकेदाराला या भागातील कचऱ्याची सफाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारी संबंधित ठेकेदाराकडून या भागातील साफसफाई करून कचरा उचलण्यात आला आहे.
जेके पार्क येथे सुरक्षारक्षक नेमण्यात यावा
जळगाव - मनपा प्रशासनाने बुधवारी शिवाजी उद्यान भागातील जेके पार्क ची जागा संबंधित डेवलपर्सकडून ताब्यात घेतली असल्याने , या जागेची देखभाल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुरक्षारक्षक नेमण्यात यावा अशी मागणी भाजपच्या नगरसेविका अॅड. शुचिता हाडा यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मनपा आयुक्त यांना देखील निवेदन दिले असून, संबंधित ठेकेदाराकडून भाडे, नुकसान भरपाई व गेल्या कालावधीतील मालमत्ता वरील दंडासह वसूल करण्याची मागणी देखील अॅड हाडा यांनी केली आहे.
मनपाकडून पुन्हा एक दुकान सील
जळगाव-जिल्हा प्रशासनाकडून ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच दुकानदारांनी जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आदेश देखील दिले आहेत. मात्र जळगाव शहरात अनेक जण या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याने मनपाकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गुरुवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी ग स सोसायटी परिसरातील एक दुकान सील केले आहे. तसेच काही दुकानदारांना देखील नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.