भविष्यालाच बनवा जीवनाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 10:36 PM2019-11-03T22:36:55+5:302019-11-03T22:37:56+5:30

आनंदास कमी करणाऱ्या गोष्टींचा आपण विचारच करीत नाही

Make the future the basis of life | भविष्यालाच बनवा जीवनाचा आधार

भविष्यालाच बनवा जीवनाचा आधार

Next

जीवनात आनंद कसा येईल, याकडे आपण सर्व लक्ष देतो, मात्र आनंदास कमी करणाऱ्या गोष्टींचा आपण विचारच करीत नाही, यासाठी एक छोटी कृती तुम्हास सांगते - आपण स्वत:ला प्रश्न विचारावा की, अशी कोणती गोष्ट आहे की, जी माझ्या आनंदला प्रभावित करते किंवा माझ्यापासून हिरावून नेते ? किंवा अशी कोणती परिस्थिती आहे की ज्यात मी खुश राहू शकत नाही ? या प्रश्नांच्या उत्तरामध्ये व्यक्तिसापेक्ष बदल होतील, त्यात सर्वांमध्ये समान असणारी बाब प्रकर्षाने समोर येते ती म्हणजे भूतकाळातील काही कटू अनुभव अजूनही आपणाकडे साठवून ठेवलेले आहेत.
आपण कुठे ना कुठे आपल्या भूतकाळातील घडलेल्या घटनांना पकडून ठेवलेले आहे. या गोष्टी जीवनातील आपल्या आनंदाला प्रभावित करीत असतात. याबाबतीत सत्यता ही असते की, ज्या वेळेस मी भूतकाळाला सोडून दिलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मी त्या घटना किंवा प्रसंगी वर्तमानात आणू शकत नाही, किंवा त्या दुरुस्त करु शकत नाही, तेव्हा मी पुन्हा आनंद कसा निर्माण करु शकणार? बहुतांश व्यक्तिंची हीच समस्या आहे की त्या भूतकाळातील चिंतनाने त्यांचे भविष्य अंधारात ढकलतात. तेव्हा भविष्यास जीवनाचा आधार बनवा.
आम्ही भूतकाळाला पकडून ठेवतो. त्याला विसरले पाहिजे. जी गोष्ट होऊन गेली तिला जाऊ दे, तिला वर्तमानात बनवू नका, परंतु भविष्यासाठी नवीन योजना बनवा. भूतकाळातील कटू, वाईट स्मृतींना कुरवाळून आपल्या उज्ज्वल भविष्याबद्दल नवा विचार करणे हे एकाच वेळेस शक्य नसते. तुमच्या विचारात भूतकाळातील कटू स्मृतींची चिंता असताना वर्तमानकाळात शांती, आनंद कसे येऊ शकतील?
तसेच आपले मन होणाºया गोष्टीत सुध्दा रंजक होते. कारण कुठला ना कुठला आनंद भविष्यकाळात शोधत असतो. आपण हे मान्य केले असते की, आपल्याकडे एखादी वस्तू असेल तर आनंद मिळेल तेव्हा माझे सर्व लक्ष याकडे असते की अमूक घडले तर मला आनंद मिळेल. याबाबतीत सत्यता ही की, या विचारा सोबत दुसराही विचार येतोच की, जर असे झाले नाही तर.... ही एक भितीसुध्दा मनात असते.
जेव्हा आमचा आनंद आम्ही अमूक एखाद्या गोष्टीवरून ठरवित असतो तेव्हा भीती सोबत येतेच. कारण, जिथे परावलंबित्व असते तेथे भितीची भावना असेलच. जर असे झाले नाही तर काय? ते निघून गेले तर काय ? असे विचार मनात येतात. त्यामुळे मानवी मन अशांत होते.

- ब्रह्मकुमारी शिवानी दीदी.

Web Title: Make the future the basis of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.