बालक खून प्रकरणातील आरोपीचे रेखाचित्र तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 18:53 IST2019-04-08T18:53:48+5:302019-04-08T18:53:58+5:30

घातपात: बुवा- बाबा, मांत्रिकांचीही पोलीसांनी केली चौकशी

Make a drawing of the accused in the case of child murder | बालक खून प्रकरणातील आरोपीचे रेखाचित्र तयार

बालक खून प्रकरणातील आरोपीचे रेखाचित्र तयार



भङगाव - येथील ९ वर्षीय ईसम बब्बू सय्यद या बालकाची अनैसर्गिक कृत्यातून अमानुषपणे हत्या करणाऱ्या संशयित आरोपीचे स्केच (रेखाचित्र) पोलीस तपास अधिकाऱ्यांच्या मदतीने करण्यात आले आहे. या आधारे लवकरच या खुन्याला जेरबंद करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली ईसम बब्बु सय्यद या इयत्ता ३ रीच्या विद्यार्थ्याचे २१ रोजी अपहरण झाले होते. २२ रोजी त्याचा मृतदेह येथील देशमुख महाविद्यालयाच्या मागील केळी बागेत मिळून आला होता. तेव्हा पासून खुन्याचा शोध सुरू आहे. दरम्यान या खूना नंतर एकाच आठवड्यात इसमच्या आई-वडिलांनी मुलीसह न्याय मिळण्यासाठी सामाजिक व मानसिक त्रासातून फाशी घेतली. त्यांच्या जवळून ३ सुसाईड नोट मिळून आल्या होत्या. या सामूहिक फाशीच्या गुन्ह्यात दोन जणांना पोलिसांनी तात्काळ अटक केली. सद्या त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर इसमच्या मारेकऱ्यांचा पोलीस युद्धपातळीवर तपास करीत आहेत. त्यासाठी पोलिस महानिरीक्षक छेरिंग व पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली ७ तपास पथक नेमण्यात आली आहे . या पथकानी भडगावात तळ ठोकून शेकडो संशयितांची कसून चौकशी सुरू केली आहे. त्यात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताचे स्केच बनविले आहे .
चिमुकल्या इसमचा निर्घुन खुन खुन कशामुळे झाला? या परीवाराच्या संपर्कात कोण कोण होते? आदीबाबत पोलीस पथकांमार्फत कसून चौकशी होत आहे. काही बुवा- बाबा, मांत्रिकांचीही पोलीसांनी चौकशी केली आहे. पोलीस पथकांनी सर्व दिशेने तपासाची चक्रे फिरविण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांना काही गुप्त माहीती मिळाली असुन त्या दिशेनेही पोलीस कसोसीने तपास करीत आहेत.
 

Web Title: Make a drawing of the accused in the case of child murder