महात्मा गांधी शिक्षण मंडळातर्फे गुणवंत शिक्षकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:18 IST2021-09-19T04:18:39+5:302021-09-19T04:18:39+5:30

चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळांतर्गत विविध शाखांमधील शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंडळाच्या कार्यालयात करण्यात आला. ...

Mahatma Gandhi Shikshan Mandal felicitates meritorious teachers | महात्मा गांधी शिक्षण मंडळातर्फे गुणवंत शिक्षकांचा सत्कार

महात्मा गांधी शिक्षण मंडळातर्फे गुणवंत शिक्षकांचा सत्कार

चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळांतर्गत विविध शाखांमधील शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंडळाच्या कार्यालयात करण्यात आला.

शिक्षिका जयश्री प्रवीण चव्हाण-पाटील यांना इनरव्हील क्लबतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार, तर रोटरीतर्फे देण्यात येणारा नेशन बिल्डर अवाॅर्ड अशोक माणिकराव साळुंखे यांना प्रदान करण्यात आला. त्यांचा सत्कार शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील व सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच हिंदी दिनानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यालयातील इयत्ता नववीमधील विद्यार्थिनी अनुष्का रमेश अहिरे हिने तालुकास्तरीय दुसरा क्रमांक पटकावला. तिचा व वडील रमेश अहिरे तसेच कर्जाने आश्रमशाळेचे मुख्याध्यापक दिलीप सोमा सावकारे यांचा स्वाभिमानी शिक्षक संघटनेतर्फे त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक मुख्याध्यापक नीळकंठ सोनवणे यांनी केले. चंद्रकांत कदम, दिनेश बाविस्कर, महेंद्र पाटील, अशोक पावरा, संजय सोनवणे, मीना पाटील, दीपक चौधरी, मनेश देसले, अशोक सोनवणे, विजय सोनवणे, आदी उपस्थित होते.

Web Title: Mahatma Gandhi Shikshan Mandal felicitates meritorious teachers