महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पुरस्कार घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:46 IST2021-01-08T04:46:58+5:302021-01-08T04:46:58+5:30
जळगाव : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांना मूकनायक, तर ज्येष्ठ पत्रकार चंदू नेवे ...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पुरस्कार घोषित
जळगाव : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांना मूकनायक, तर ज्येष्ठ पत्रकार चंदू नेवे यांना जीवनगौरव पुरस्कार मंगळवारी (दि.५) जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त विविध पुरस्कार देऊन पत्रकारांना सन्मानित करण्यात येत असते. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० साली प्रकाशित केलेल्या मूकनायक पाक्षिकास शंभर वर्षं पूर्ण होत असल्याने शतकपूर्तीनिमित्त पत्रकार संघ राज्यभरातील पत्रकारांना मूकनायक पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे. त्याचबरोबर दरवर्षी पत्रकारितेत दीर्घकाळ सेवा करणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असते. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या निवड समिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडेय, राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्कारांची घोषणा करण्यात आल्याचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी कळविले आहे. पुरस्कार वितरण सोहळा २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवन येथे सकाळी १० वाजता होणार आहे.