पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांचा बळी घेणाऱ्या दशहतवाद्यांचा हिशेब चुकता करण्यासाठी देशाने ऑपरेशन ‘सिंदूर राबविले. या पाकवरच्या यशस्वी हल्ल्यानंतर चाळीसगावकर पर्यटकांनी आनंद व्यक्त केला आहे. अनेकींचा ‘कुंकू’ पुसणाऱ्या दहशवादी वृत्तीचे ऑपरेशन ‘सिंदूर’ने यशस्वी केल्याची भावना चाळीसगावकरांनी व्यक्त केली.
दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन हल्ला केला त्यावेळी चाळीसगावचे १५ पर्यटक पहलगाममध्येच पर्यटन करत होते. ही घटना घडल्यानंतर हादरलेल्या चाळीसगावकरांना स्थानिक प्रशासनाने हॉटेलमध्ये पोहोचवले आणि दुसऱ्यादिवशी श्रीनगरला रवाना केले होते. त्यात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा देवयानी ठाकरे, एस.पी.ठाकरे, जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील (हिरापूर), मंजूषा पाटील, आनंदा पाटील (मेहू ता.पारोळा), शीला पाटील, एल.ए.पाटील (माळशेवगे), नीलिमा पाटील, अशोक खेडेकर (चिखली बुलडाणा), मंगला खेडेकर, सुरेखा पाटील, सुषमा पाटील, सिद्धार्थ पाटील, चेतन देशमुख (तळेगाव ता.चाळीसगाव) यांचा समावेश होता.
देवयानी ठाकरे म्हणतात, ऊर भरुन आला...‘ऑपरेशन सिंदूर’वर बोलताना देवयानी ठाकूर म्हणाल्या, देशातील सुरक्षा व्यवस्थेने अतिशय शांतपणे पाकवर हल्ला केला. याची कुणकुणही लागू दिली नाही. वायुसेना, लष्करी दलासह या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक घटकाचा अभिमान वाटतो. अनेकींचे कुं कू पुसणाऱ्यांचा हिशेब घेण्यासाठी ‘सिंदूर’च्या माध्यमातून देशाने पहिले पाऊल उचलले आहे. पहिल्याच हल्ल्यात पाकिस्तानला चपराक दिली आहे. या ऑपरेशनविषयी माहिती देण्यासाठी जेव्हा वरिष्ठ महिला अधिकारी समोर आल्या तेव्हा ऊर भरुन आला.
पाकला औकात दाखवायची गरजच होतीया पर्यटकांमधील जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेच भावराव पाटील यांनीही ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी आनंद व्यक्त केला. देशाच्या अस्तित्वाला धक्का लावणाऱ्यांवर वचक बसविण्याची गरज होती. ‘ऑपरेशन सिंदूर’ने दशहतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त केले, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यापुढेही देशाने पाकिस्तानच्या बाबतीत कठोरच भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आहे.