शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

महाराज आपला मानबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 12:39 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘रंग संगती’ या सदरात अ‍ॅड.सुशील अत्रे यांचा विशेष लेख ‘महाराज आपला मानबिंदू’

हा लेख मी लिहीत आहे शिवजयंतीच्या शुभदिवशी. त्यामुळे चित्राचा विषय एकच- श्री शिवछत्रपती! या लेखासोबत महाराजांची दोन चित्रे दिली आहेत. महाराजांच्या हयातीत काढली गेलेली (आतापर्यंत सापडलेली) विश्वासार्ह अशी हीच दोन चित्रे आहेत. योगायोग कसा आहे, बघा- मराठी माणसाचं आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांची ही चित्रे काढली आहेत ती मात्र परकियांनी. कोणाही मराठी कलाकाराने, चित्रकाराने महाराजांचं चित्र काढलेलं दिसून आलेलं नाही; किंवा काढल्याचा उल्लेखसुद्धा कुठेही आढळून आलेला नाही. (त्या काळी!)या चित्रांपैकी अश्वारूढ महाराज व त्यांचे सैनिक हे चित्र मीर महंमद या मुघल चित्रकाराने काढलं आहे. मिर्झाराजे जयसिंग इकडे दख्खनच्या स्वारीवर आले. त्या वेळी त्यांच्यासोबत निकोलाओ मनुची हा इटालियन माणूस होता. तो हरहुन्नरी होता. त्याने भारतातल्या सुमारे ५५-५६ राजे-रजवाड्यांची चित्रे मुद्दाम काढून घेतली होती. अश्वारूढ महाराजांचं चित्र मीर महंमदने या मनुचीसाठीच काढून दिलं होतं. ते पुरंदरच्या तहाच्या सुमारास काढलेलं आहे. बहुदा सन १६७२ साली ते काढलंय. ‘दखनी मिनिएचर पेंटिंग’ या चित्रशैलीत ते काढलेलं आहे. सोबत लवाजमा घेऊन महाराज घोड्यावरून जाताना (बहुदा कोणाच्यातरी भेटीला त्यात दाखवले आहेत. मनुचीने या चित्राचं पुढे काय केलं. त्याचा नेमका इतिहास उपलब्ध नाही; पण सध्या हे मूळ चित्र पॅरिस येथील कलासंग्रहात आहे.दुसरे चित्र हे शिवाजी महाराजांचे सगळ्यात प्रसिद्ध आहे. महाराजांचे अस्सल (मूळ) चित्र म्हणून त्याला राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. सध्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये, शासनाच्या कागदपत्रांमध्ये हेच चित्र वापरलं जातं. पण आपण सध्या त्याची रंगीत प्रत सगळीकडे वापरतो. ती रंगीत प्रत ज्या चित्रावरून तयार केली. ते मूळ चित्र मात्र कृष्णधवल आहे. ते एका डच चित्रकाराने काढलं आहे. बहुदा ते, राज्याभिषेकानंतर महाराज दक्षिणेत कुतुबशहाच्या भेटीला गेले होते, त्या सुमारास काढलं असावं. ‘फ्रान्सवा व्हॅलेंटाईन’ या डच अधिकाºयाने भारतावरती लिहिलेल्या पुस्तकाच्या एका खंडात ते समाविष्ट आहे. हर्बर्ट-डी-जॅगर या डच चित्रकाराने ते काढलं होतं.  ज्येष्ठ इतिहास संशोधक वा.सी. बेंद्रे यांना सन १९१९ च्या आसपास सर्वप्रथम या चित्राचा शोध लागला. त्यांनी त्या काळी या चित्राचे छायाचित्र घेऊन ते प्रसिद्ध केले.महाराष्ट्र सरकारने अधिकृत चित्र म्हणून ते स्वीकारलं खरं, पण त्याची फक्त फोटोप्रत आपल्याकडे उपलब्ध होती. अगदी अलीकडे. २०१६ साली पुण्याच्या मालोजीराव जगदाळे या इतिहासप्रेमी तरुणाने प्रचंड परिश्रम घेऊन, पदरचे पैसे खर्च करून हे मूळ कृष्णधवल चित्र डच संग्राहकाकडून विकत घेतले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कलासंग्रहालयाला हे चित्र सप्रेम भेट देण्याचा जगदाळेंचा इरादा आहे.- अ‍ॅड.सुशील अत्रे

टॅग्स :Jalgaonजळगाव