पहूर येथे कोरोना संकट निवारण्यासाठी पांडुरंगाला महाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:12 IST2021-07-21T04:12:36+5:302021-07-21T04:12:36+5:30

पेठ गावात पुरातन विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आहे. या ठिकाणी गावातील ग्रामस्थांनी महाभिषेक करून संकट निवारण्यासाठी प्रार्थना केली. यात शिवसेना उपजिल्हा ...

Mahabhishek to Panduranga to solve the Corona crisis at Pahur | पहूर येथे कोरोना संकट निवारण्यासाठी पांडुरंगाला महाभिषेक

पहूर येथे कोरोना संकट निवारण्यासाठी पांडुरंगाला महाभिषेक

पेठ गावात पुरातन विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आहे. या ठिकाणी गावातील ग्रामस्थांनी महाभिषेक करून संकट निवारण्यासाठी प्रार्थना केली.

यात शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉ. मनोहर पाटील, प्रगतशील शेतकरी अशोक पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष शैलेश पाटील, वाघूर विकास आघाडीप्रमुख सुकलाल बारी, ग्रामपंचायत सदस्य शरद पांढरे, दिलीप पांढरे या पाच जणांच्या हस्ते सपत्निक महाभिषेक करण्यात आला. या वेळी माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा, उपसरपंच श्यामराव सावळे, माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष शरद पाटील, रवींद्र पांढरे, कडुबा पाटील, भास्कर पांढरे, विजय पांढरे, भाऊराव गोंधनखेडे, ज्ञानेश्वर घोलप, बापू सोनार उपस्थित होते.

200721\20jal_5_20072021_12.jpg

पहूर पेठ गावातील पुरातन विठ्ठल मंदिरात महाभिषेक पुजेत सहभागी ग्रामस्थ व उपस्थित पदाधिकारी.

Web Title: Mahabhishek to Panduranga to solve the Corona crisis at Pahur