माहेश्वरी युवा संघटनच्या अध्यक्षपदी मधुर झंवर बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:44 IST2020-12-04T04:44:53+5:302020-12-04T04:44:53+5:30
जळगाव : येथील माहेश्वरी युवा संघटनची वार्षिक २०२०-२१ ची कार्यकारिणी नुकत्याच झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी ...

माहेश्वरी युवा संघटनच्या अध्यक्षपदी मधुर झंवर बिनविरोध
जळगाव : येथील माहेश्वरी युवा संघटनची वार्षिक २०२०-२१ ची कार्यकारिणी नुकत्याच झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी मधुर झंवर तर सचिवपदी अक्षय बिर्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
माहेश्वरी प्रगती मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही कार्यकारणी जाहिर झाली. कार्याध्यक्ष अभिलाष राठी, उपाध्यक्ष स्मितेश बिर्ला, कोषाध्यक्ष मयुर धुप्पड, सहसचिव संकेत जाखेटे, संघटनमंत्री संतोष समदानी, शुभम मंडोरा, सांस्कृतिक मंत्री अक्षय लढ्ढा, क्रीडामंत्री अर्पित बेहेडे, प्रसिद्धी प्रमुख आदित्य बेहेडे, गणेश लढ्ढा, कार्यकारिणी सदस्य अभिषेक झंवर, कपिल लढ्ढा, विष्णू मुंदडा, सचिन लाहोटी यांची निवड करण्यात आली. बैठकीला गोविंद मंत्री, निलेश झंवर, विशाल तापडिया, राहुल लढ्ढा, संदिप दहाड, भूषण मुंदडा, मनीष बाहेती आदी उपस्थित होते. कार्यकारिणीचे माहेश्वरी समाजातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.