या रोगाच्या लक्षणांप्रमाणे अंगावर फोड उठून असह्य ताप येऊन गायीने चारा खाणे बंद केला आहे. पशुपालक प्रल्हाद महाजन अटवाडे यांनी या प्रकाराची माहिती प्रभारी पशुधन पर्यवेक्षक प्रशांत खाचणे यांना दिली. त्यांनी पशुधनात लम्पी स्किन डिसीजची लक्षणे दिसत असल्याचे सांगून औषधोपचार केले. मात्र, दोन दिवस काहीही फरक न वाटल्याने त्यांनी तालुका पशुसर्वरोगचिकित्सालयाचे सहाय्यक पशुधन आयुक्त डॉ. रणजित पाटील यांना बोलावले. या लक्षणांवरून तापाची औषधे, प्रतिजैविके व जीवनसत्वाची औषधे देऊन त्यांनी विलगीकरणाचा सल्ला दिला आहे. लम्पी स्किन डिसीज हा विषाणूजन्य कोरोनासारखा आजार असून, त्यावर ठराविक असा कोणताही वैशिष्ट्यपूर्ण औषधोपचार नाही. जनावराला असलेल्या आजाराच्या लक्षणांवरून औषधोपचार करून नियंत्रण मिळवता येत असल्याचे पाटील म्हणाले.
कोट
एखाद्यावेळी त्वचेचा ॲलर्जीचा आजार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लम्पी स्किन डिसीजचा दावा करणे चुकीचे ठरू शकते. मात्र, संभाव्य परिस्थिती पाहता, विलगीकरण करून लक्षणांनुसार औषधोपचार सुरू केले आहेत.
- डॉ. रणजित पाटील, प्रभारी सहाय्यक पशुसंवर्धन उपायुक्त, रावेर.