बसमधून साडेतीन लाखाचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 21:48 IST2019-12-08T21:48:18+5:302019-12-08T21:48:23+5:30
लग्नासाठी आलेल्या महिलेस फटका

बसमधून साडेतीन लाखाचे दागिने लंपास
यावल : बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेचे तब्ब्बल साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रविवारी सायंकाळी सुरु होती.
याबाबत अधिक वृत्त असे, की मीना देवसिंग पाटील (रा. नांदुरा ) या ६ डिसेंबरला नांदुरा येथून रेल्वेने भुसावळला येऊन, तेथून यावल येथे आल्या. यानंतर यावलहून मंगळूरपीर नंदुरबार बस (क्र. एम.एच. ५७८० ) ने चोपडा येथे जाण्यासाठी बसमध्ये चढल्या.
मात्र चोपडा येथे व्याही यांचे घरी पोहोचल्यावर दागीने ठेवलेल्या पिशवीत दागिने आढळून आले नाही. सोन्याच्या बांगडया, मंगळसूत्र, व पाटल्या असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यामुळे मीना पाटील यांनी याबाबत यावल पोलिस स्टेशनला येऊन फिर्याद दिली आहे.