चक्रीवादळात जीव गमावलेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST2021-06-19T04:12:38+5:302021-06-19T04:12:38+5:30

अमळनेर : गेल्या महिन्यात आलेल्या चक्रीवादळात जीव गमावलेल्या तीन जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदतीचा धनादेश देण्यात आला. ...

Lost their lives in a hurricane | चक्रीवादळात जीव गमावलेल्या

चक्रीवादळात जीव गमावलेल्या

अमळनेर : गेल्या महिन्यात आलेल्या चक्रीवादळात जीव गमावलेल्या तीन जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदतीचा धनादेश देण्यात आला. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते धनादेश तहसील कार्यालयात त्यांच्या वारसांना देण्यात आले.

१६ मे रोजी आलेल्या चक्रीवादळात आंचलवाडी येथील रोशनी बल्लू बारेला व ज्योती बल्लू बारेला या बहिणी ठार झाल्या होत्या, तर दुसऱ्या घटनेत दिलीप भादूगीर गोसावी हे ठार झाले होते. त्यांचे या बहिणींचे वडील बल्लू बारेला व आई, तसेच दिलीप गोसावी यांचे वडील भादूगीर गोसावी यांच्याकडे हे धनादेश सोपविण्यात आले. मुख्यमंत्री सहायता निधीतून अजून प्रत्येकी एक लाखांची मदत मिळणार असल्याचे आमदारांनी सांगितले. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, आंचलवाडी, पळासदाडे येथील ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनाही प्रत्येकी वीस हजार रकमेचे धनादेश वारसांना वितरित करण्यात आले. यावेळी रूपाली प्रदीप ठाकूर रा.अमळनेर, हिराबाई वसंत भिल रा.दापोरी बु., वंदना जगदीश पाटील रा.देवगाव, अर्चना प्रवीण पाटील रा.दहिवद, आशाबाई राजू पारधी रा.अमळनेर, शेवकाबाई शांताराम भिल रा.दापोरी बु., छायाबाई भाऊसाहेब पाटील रा.दहिवद, मायाबाई ईश्वर पाटील रा.अमळनेर यांचा समावेश होता.

Web Title: Lost their lives in a hurricane