साहित्य क्षेत्रातील क्षेत्रातील `उमदे` व्यक्तिमत्व हरपले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:27 IST2021-03-04T04:27:57+5:302021-03-04T04:27:57+5:30

जळगाव : माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. किसन पाटील हे उत्तम समिक्षक, संशोधक, लोकभाषा व लोक संस्कृतीचे गाढे ...

Lost personality in the field of literature ... | साहित्य क्षेत्रातील क्षेत्रातील `उमदे` व्यक्तिमत्व हरपले...

साहित्य क्षेत्रातील क्षेत्रातील `उमदे` व्यक्तिमत्व हरपले...

जळगाव : माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. किसन पाटील हे उत्तम समिक्षक, संशोधक, लोकभाषा व लोक संस्कृतीचे गाढे अभ्यासक म्हणून ते महाराष्ट्राला परिचित होते. त्यांचा स्वभाव हा नेहमी हसरा आणि मनमिळावू होता. त्यांच्या अचानक निधनाच्या बातमीने मोठा धक्का बसला असून, त्यांच्या रूपाने साहित्य क्षेत्रातील एक `उमदे `व्यक्तिमत्व हरपल्याची भावना साहित्यिकांनी `लोकमत`शी बोलतांना व्यक्त केल्या.

मराठी भाषेचे व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते. त्यांच्या निधनाने खान्देशातील मराठीतील अभ्यासकांमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे.

प्रभाकर महाजन, ज्येष्ठ कवी.

- साहित्य क्षेत्रातील अत्यंत विश्वासू, मनमिळावू साहित्यिक अशी त्यांची ओळख होती. संशोधक,लोकभाषा व लोक संस्कृतीचे गाढे अभ्यासक म्हणून ते महाराष्ट्राला परिचित होते. लेखक, कवी घडविण्यात व त्यांना प्रोत्साहन देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे.

अशोक कोतवाल, ज्येष्ठ साहित्यिक

- साहित्य क्षेत्रातील एक उमदे व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे. ते नेहमी अभ्यास पूर्ण मार्गदर्शन करायचे, सर्वांच्या मदतीला धावून जायचे, त्यांच्यामुळे खान्देशातील साहित्य सृष्टीत विविध रंग भरून होते. त्यांच्या अचानक जाण्याने खान्देशातील साहित्य विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

माया धुप्पड, ज्येष्ठ साहित्यिका.

-ते लेखक असण्या बरोबरच उत्तम समिक्षकही होते. नव लेखकांना, लिहणाऱ्या हातांना ते नेहमी प्रोत्साहन देत असे. हे व्यक्तीमत्व अचानक निघून गेल्याने अत्यंत दुख होत आहे.

डॉ. मिलिंद बागुल, ज्येष्ठ साहित्यिक

- प्रा. किसन पाटील यांची साहित्य क्षेत्रातील सेवा कधीही विसरली जावू शकत नाही. विद्यार्थांना निव्वळ पुस्तकी ज्ञान न देता, त्यांच्यात ज्ञान लालसा कशी निर्माण होईल, या पद्धतीने ते शिकवित असत. त्यांची सत्यशोधकी विचारांशी एक नाळ जुडलेली होती. सत्यशोधकी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग मी स्वत: अनुभवलेला आहे.

जयसिंग वाघ, फुले आंबेडकरी साहित्यिाचे अभ्यासक

- गुरुवर्य प्राचार्य डॉ. किसन पाटील यांच्या निधनाने खानदेशातील साहित्य आणि सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. प्रमाणभाषा आणि बोली भाषा या दोन्हीतून विपुल साहित्यसंपदा त्यांनी लिहिली. लोकभाषा, लोकव्यवहार ,लोकनीती, चालीरीती यांचा चिकित्सक अभ्यास करणारा महाराष्ट्रातील एक द्रष्टा विचारवंत म्हणून सरांनी ओळख निर्माण केली. मार्गदर्शक म्हणून सर नेहमी स्मरणात राहतील.

प्रा. डॉ. सत्यजित साळवे, (मराठी विभाग प्रमुख), डॉ.अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव

खानदेशस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. किसन पाटील यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मन सुन्न झाले. परमपूज्य साने गुरुजी यांच्या विषयी सरांचा अभ्यास होता. अलिकडे ते बालसाहित्यातही रममाण होत होते.

सतीश जैन. अध्यक्ष , सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ.

-प्राचार्य डॉ. किसन पाटील सरांनी प्राचार्य नंतर विद्यापीठ पातळीवर भाषाशास्र, बोली साहित्य, समिक्षा, संपादन, बालसाहित्य, काव्य, नाट्य, वैचारिक अशा विविध वाड.मय प्रकारात निर्मिती केली. या सोबतच पीएचडी मार्गदर्शक म्हणून महत्वपूर्ण कामगिरी करतांना त्यांच्या मार्गदर्शनात १६ विद्यार्थी पीएच.डी झालेले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने साहित्य क्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.

सुरेश साबळे, ज्येष्ठ साहित्यिक, बुलडाणा.

साहित्य विश्वातील ते महान कर्मयोगी असा त्यांचा उल्लेख करता येइल. त्यांनी साहित्य क्षेत्रातील विविध पैलूंवर संशोधन केले. त्याच्या अचानक जाण्याने खुप दुख होत आहे. : प्रा.म.सु.पगारे, संचालक, मराठी विभाग प्रमुख, कबचौउमवि

Web Title: Lost personality in the field of literature ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.