शेंदुर्णी येथे चांगल्या पावसासाठी भगवान त्रिविक्रमास जलाभिषेक
By Admin | Updated: July 13, 2017 18:06 IST2017-07-13T18:06:45+5:302017-07-13T18:06:45+5:30
शेंदुर्णी शहर ब्राrाण संघातर्फे आयोजन

शेंदुर्णी येथे चांगल्या पावसासाठी भगवान त्रिविक्रमास जलाभिषेक
ऑनलाईन लोकमत
शेंदुर्णी,जि.जळगाव,दि.13 - सध्या पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी बांधव संकटात आहेत. शेतीच्या हंगामासाठी चांगला पाऊस व्हावा यासाठी शेंदुर्णी शहर ब्राrाण संघातर्फे ग्रामदैवत भगवान श्री त्रिविक्रमास जलाभिषेक करण्यात आला.
पावसाअभावी शेतातील पिके हातची जाण्याची भिती आहे. दुबार पेरणीच्या स्थितीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सर्वत्र जोरदार पाऊस व्हावा यासाठी गुरुवारी वैदिक मंत्रोच्चारात ग्राम दैवत भगवान श्री.त्रिविक्रमास जलाभिषेक करण्यात आला.