शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

सरकारमध्ये सहभागी तिन्ही पक्षांकडून जनतेची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST

चाळीसगाव : राज्यात तीन तिघाडी सरकार आल्यापासून तीनही पक्षांकडून जनतेची लूट व वसुली सुरू करण्यात आली. आजवर हाताने नोटा ...

चाळीसगाव : राज्यात तीन तिघाडी सरकार आल्यापासून तीनही पक्षांकडून जनतेची लूट व वसुली सुरू करण्यात आली. आजवर हाताने नोटा मोजायचे ऐकले होते; मात्र वसुली केलेल्या नोटा मोजण्यासाठी मशीन सापडणे, हे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा घडले, अशी टीका माजी कृषी व पणनमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी येथे केली.

बुधवारी दुपारी १२ वाजता रयत क्रांती संघटनेतर्फे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण, संघटनेचे प्रदेश प्रवक्ते भानुदास शिंदे, पुणे युवा जिल्हाध्यक्ष गणेश साळुंखे, जिल्हाध्यक्ष डॉ. हिम्मत पाटील, तालुकाध्यक्ष अशोक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब जाधव, पंचायत समिती गटनेते संजय पाटील, शेषराव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, देवेंद्र पाटील, डॉ. अजय पाटील, विजय पाटील, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, लोकसंखेचा आकडा न देता आल्याने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. वसुली करायला वेळ; मात्र ओबीसी जनगणना करायला वेळ नाही. त्यामुळे मराठा, ओबीसी, धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. राज्यभरातील बळीराजा अनंत अडचणीत आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असताना बँका पीक कर्ज देण्यास नकार देत आहेत. बहुतांश ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळण्याची प्रतीक्षा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकरी, कष्टकरी सोबतच मराठा-ओबीसी, बारा बलुतेदारवर्गाचा भ्रमनिरास झाला आहे. चळवळीत शेतकऱ्यांसाठी काम करत असताना माझ्यावर २५० हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. मंगेश चव्हाणसारखा आमदार तुमच्यासाठी अंगावर गुन्हे घेतो, जेलमध्ये जातो, हे जमिनीवरील कार्यकर्ताच करू शकतो.

शालिग्राम निकम यांनी सूत्रसंचालन केले तर स्नेहल सापनर या लहान मुलीने स्वागत गीत सादर केले.

जळगाव जिल्ह्यात ऊसाच्या भावाबाबत दुजाभाव

एकीकडे पश्चिम महाराष्ट्रात उसाला ३ हजार रुपये भाव मिळत असताना इकडे जळगाव जिल्ह्यातील उसाला २३०० प्रमाणे भाव देऊनदेखील अजून पहिला हफ्ता सहा महिन्यांपासून मिळाला नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आमचे सरकार असताना साखरेचा भाव २९ रुपयावरून वरून ३२ रुपये केला, इथेनॉल १० वरून २० टक्के केले. सोयाबीन आयात बंद करून भाव दिला. महाविकास आघाडी सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना १ रुपया अनुदान सुद्धा दिले नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात जलयुक्त शिवार, आडत नियमनमुक्ती, संत शिरोमणी सावता माळी भाजीपाला बाजार अश्या योजना कृषी विभागाने राबवल्या; मात्र मध्यंतरी अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनादेखील भरपाई मिळालेली नाही. कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, शेतमजूर वर्गाला मदत नाही, पीकविम्याची भरपाई नाही. दवाखाने कर्जमुक्त झाले; मात्र सर्वसामान्य जनता शासनाच्या धोरणामुळे कोरोना काळात कर्जबाजारी झाली आहे, असा घणाघातही सदाभाऊ खोत यांनी केला.