धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे गोळीबार करीत ग्राहकांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:47 IST2019-03-02T00:44:15+5:302019-03-02T00:47:04+5:30
ढाब्यांवरील ग्राहकांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवून मोबाइल व पैसे लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान पाळधी येथे घडली. भुसावळच्या या इसमाने गावठी कट्ट्यातून एक राऊंड फायर केल्याचेही समजते.

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे गोळीबार करीत ग्राहकांना लुटले
पाळधी, ता.धरणगाव, जि.जळगाव : ढाब्यांवरील ग्राहकांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवून मोबाइल व पैसे लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान पाळधी येथे घडली. भुसावळच्या या इसमाने गावठी कट्ट्यातून एक राऊंड फायर केल्याचेही समजते. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सूत्रांनुसार, पाळधी येथील तोतला पेट्रोलपंपाजवळ असलेल्या ढाब्यांमध्ये जावून अज्ञात इसमाने गावठी कट्ट्याचा धाक दाखवला. या इसमाने ढाब्यांमधील ग्राहकांकडून मोबाइल व रोख पैसे लुटले. सुमारे अर्धा डझन ग्राहकांकडील मोबाइल व पैसे लुटल्याची माहिती आहे. काही ग्राहकांनी विरोध केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याचे समजते. दरम्यान, एलसीबीचे पथक रात्रीच घटनास्थळी पोहोचले. या पथकाने भुसावळ येथील रहिवासी असलेल्या इसमास ताब्यात घेतले.