Lok Sabha Election 2019 : सत्तेची मग्रुरी चढलेल्या सरकारला धडा शिकवा - जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 13:09 IST2019-04-16T13:08:46+5:302019-04-16T13:09:07+5:30
चाळीसगावला राष्ट्रवादीचा युवक मेळावा

Lok Sabha Election 2019 : सत्तेची मग्रुरी चढलेल्या सरकारला धडा शिकवा - जयंत पाटील
चाळीसगाव, जि.जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात एका रात्रीतून लागू केलेल्या नोटबंदीत अनेक गोरगरीबांचा बळी गेला. आश्वासनांची पुर्तता पुर्ण करण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. अशा या सरकारला धडा शिकावावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथील युवक मेळाव्यात केले.
यावेळी ज्येष्ठ नेते प्रदीप देशमुख, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार मनीष जैन, राजीव देशमुख, ओबीसी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, माजी आमदार ईश्वर जाधव, माजी जि.प.सदस्य संजय गरुड, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. जळगाव भाजपात झालेली हाणामारी गाजल्याने जळगाव देशभर प्रसिद्धीस आले आहे. मोदी सरकारने शहीद जवानांच्या नावे मते मागण्याचे राजकारण केले असल्याची टीका आव्हाड यांनी केली.