दारुच्या दुकानाला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 20:28 IST2021-01-31T20:28:17+5:302021-01-31T20:28:26+5:30

कारवाई

Locks knocked on the liquor store | दारुच्या दुकानाला ठोकले कुलूप

दारुच्या दुकानाला ठोकले कुलूप

भुसावळ : येथील  जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीज परिसरातील जे. जी. नागराणी यांच्या देशी दारू दुकानास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारणे दाखवा नोटीस बाजावत सील ठोकल्याची कारवाई करण्यात आली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यस्तरीय पथकाने शहरातील दारू दुकानांची तपासणी केली होती. यात येथील जे.जी. नागराणी यांच्या देशी दारू दुकानाचीही तपासणी करण्यात आली होती. त्यात त्रुटी आढळून आल्याने राज्यस्तरीय पथकाने एमआरपीसीची केस नोंदविली होती. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना सादर करण्यात आला होता. यानुसार २९ रोजी दुकान सील करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार राज्य उत्पादन विभागाचे विभागीय निरीक्षक ईश्‍वर वाघ यांनी पथकासह नागराणी यांच्या  (कांबडी बार) दुकानात दाखल होत. सील केल्याची कारवाई केली. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत  सील कायम राहणार      आहे.

Web Title: Locks knocked on the liquor store