३१ मार्चपर्यत भुसावळ आणि वरणगाव आॅर्डनन्स फॅक्टरीला लॉक डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 12:43 IST2020-03-24T12:42:40+5:302020-03-24T12:43:06+5:30
भुसावळ/वरणगाव, जि. जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आॅडनन्स फॅक्टरी भुसावळ व वरणगाव येथे सोमवारी लॉक डाऊन घोषित करण्यात ...

३१ मार्चपर्यत भुसावळ आणि वरणगाव आॅर्डनन्स फॅक्टरीला लॉक डाऊन
भुसावळ/वरणगाव, जि.जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आॅडनन्स फॅक्टरी भुसावळ व वरणगाव येथे सोमवारी लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून शासकीय स्तरावर प्रत्येक विभागाला सतर्कतेचे अध्यादेश काढण्यात आले आहे. यानुसार भुसावळ येथील आॅर्डनन्स फॅक्टरी लॉक डाऊन घोषित केला आहे. फॅक्टरीतील वैद्यकीय सेवा, फायर ब्रिगेड, सिक्युरिटी अशा अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. बाराशे कर्मचारी असलेल्या भुसावळ आॅर्डनन्स फॅक्टरी मध्ये प्रथमच अशा पद्धतीने लॉक डाउन घोषित करण्यात आलेले आहे. बाहेरगावाहून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी करण्यात येत आहे. त्याची वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहे
वरणगाव येथेही उत्पादन बंद
वरणगाव आयुध निर्माणीमधील कर्मचारी २३ मार्च ते ३१ मार्चपर्यत घरीच राहतील. यामुळे उत्पादन बंद राहणार आहे. गरज पडल्यास फोनवरून काम करावे लागेल. दरम्यान अत्यावश्यक सेवेत येणारे अग्नीशमन, सीई, विद्युत विभाग, सुरक्षा व काही अधिकारी नियमित कामावर येतील. महाप्रबंधक एस. चटर्जी यांनी वरिष्ठांशी चर्चा केल्यावर हा निर्णय घेतला आहे.