कोविडमुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला कर्ज योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:10+5:302021-07-02T04:12:10+5:30
भुसावळ : कोरोनामुळे कुटुंबातील प्रमुखाचे निधन झालेल्या व्यक्तीच्या वारसाला कर्ज योजना जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय अनुसूचित ...

कोविडमुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला कर्ज योजना
भुसावळ : कोरोनामुळे कुटुंबातील प्रमुखाचे निधन झालेल्या व्यक्तीच्या वारसाला कर्ज योजना जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्लीतर्फे चर्मकार समाजासाठी ‘स्माईल’ ही नवी योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यात कोविड १९ महामारीत ज्या कुटुंब प्रमुखाचे निधन झाले आहे. त्यात कुटुंबातील वारसांना एन.एस.एफ.डी.सी, नवी दिल्लीतर्फे पाच लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज दिले जाणार आहे. त्यात एक लाख रुपये भांडवली अनुदान मिळणार असून, चार लाख रुपये कर्ज हे सहा टक्के व्याज दराने मिळेल.
अर्जदारांनी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज करावे, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापक एस.एल. तडवी यांनी केले आहे.