बसमध्ये चढताना महिलेची पोत लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 13:17 IST2019-05-17T13:16:36+5:302019-05-17T13:17:10+5:30

साडेसात हजार रूपयांची मंगलपोत

Lift of woman vessel as she rises in bus | बसमध्ये चढताना महिलेची पोत लंपास

बसमध्ये चढताना महिलेची पोत लंपास

जळगाव : माहेरी जाण्यासाठी शिरपूर बसमध्ये चढत असताना प्रवासी महिलेची साडेसात हजार रूपयांची मंगलपोत चोरट्याने लंपास केली. ही घटना गुरूवारी सकाळी ९़४५ वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानकावर घडली़
रूपाली गिरीश गुरव या पती आणि दोन मुलांसह पिंप्राळा परिसरातील असावा नगरात वास्तव्यास आहेत़ मुलांना उन्हाळ्याची सुटी लागल्याने त्या मध्यप्रदेशातील बडवानी येथे माहेरी जाण्यासाठी सकाळी नवीन बसस्थानकावर पती आणि मुलांसह आल्या. सकाळी १०़४५ वाजता शिरपूर बसमध्ये गुरव कुटुंबीय चढले. गर्दी असल्यामुळे रूपाली या नंतर बसमध्ये गर्दीसोबत चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगलपोत चोरून नेली़ दरम्यान, बसमध्ये चढत असतानाच एका महिलेने रूपाली यांना त्यांची मंगलपोत तुटल्याचे लक्षात आणून दिले़ त्यांनी लागलीच मंगलपोतचा शोध घेतला फक्त काळे मणीच बसच्या पायरीवर आढळून आले़ अखेर मंगळपोतमधील सोन्याच्या वाट्या व मणी चोरीला गेल्याचे त्यांना खात्री झाली़
मणी व वाट्या लंपास
चोरट्यांनी मंगलपोतमधील सोन्याच्या ५ हजार रूपये किंमतीच्या २ ग्रॅमच्या सोन्याच्या वाट्या व अडीच हजार रूपये किंमतीचे ४ सोन्याचे मणी चोरट्यांनी लांबविले असल्याची फिर्याद रूपाली गुरव यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिली आहे़ त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Lift of woman vessel as she rises in bus

टॅग्स :Jalgaonजळगाव