जी.टी.टाककळमसरे, ता.अमळनेर, जि.जळगाव : डायलेसीसच्या औषधाअभावी प्रकृती खालावलेल्या रूग्णाला लॉकआऊटच्या कठीण समयी ओळखीच्या मित्रांच्या माध्यमातून थेट औरंगाबाद येथून काही तासात औषधी घरपोच मागवून मारवडचे सपोनि राहुल फुला यांनी एका महिलेला जीवदान दिले.धरणग्रस्त पाडळसे गावाच्या माजी सरपंच बेबाबाई योगराज पाटील ह्या सहा-सात वर्षांपासून आजारी आहेत. त्यांचे डायलेलीसचे औषध दोन दिवसांपूर्वी संपल्याने प्रकृती खूप खालावत चालली होती. औरंगाबाद अथवा पुणे शिवाय औषधी मिळत नसल्याने त्यांचा मुलगा सचिन याने अमळनेरचे प्रांत व तहसीलदारांकडे औरंगाबाद येथे जाण्याची मागितलेली परवानगी लॉकआऊटमुळे नाकारण्यात आली. सचिन पाटील यांनी मारवडचे सपोनि राहुल फुला यांच्याकडे कैफीयत मांडून औषध मिळाले नाही तर आईचा जीव धोक्यात जाण्याची भीती व्यक्त केली. फुला यांनी तत्काळ त्यांच्या औरंगाबाद येथील काही मित्रांशी संपर्क साधून औषध विक्रेत्याकडून डायलेसीसचे औषध पाठविण्याची विनंती केली. रूग्णाच्या ट्रिटमेंटची कागदपत्रे व्हॉटसअॅपवर पाठवून कायदेशीर पूर्तता करण्यात आली. सुमारे पाच हजार रुपये वाहनाचा खर्च करून, काही तासातच डायलेसीसची औषधी थेट पाडळसे येथे सहकारी स्टाफसह पोहच केली. सचिन पाटील यांचा परिवार व ग्रामस्थांना गहीवरून आले. फुला यांचे बेबाबाईंनी आभार मानले. आज औषध मिळाले नसते तर आईला धोका होता फुल यांनी मानवतेचे दर्शन घडविल्याची भावना सचिन याने व्यक्त केली.
पोलीस अधिकाऱ्याच्या प्रयत्नातून महिलेला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 21:22 IST
डायलेसीसच्या औषधाअभावी प्रकृती खालावलेल्या रूग्णाला लॉकआऊटच्या कठीण समयी ओळखीच्या मित्रांच्या माध्यमातून थेट औरंगाबाद येथून काही तासात औषधी घरपोच मागवून मारवडचे सपोनि राहुल फुला यांनी एका महिलेला जीवदान दिले.
पोलीस अधिकाऱ्याच्या प्रयत्नातून महिलेला जीवदान
ठळक मुद्देडायलेसीसचे औषध नसल्याने प्रकृती होती खालावलीप्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर राहुल फुला यांनी मित्रांच्या सहकार्याने औरंगाबादहून मागविली औषधी