ग्रंथालये उघडली पण, सभासदांचा प्रतिसाद मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:13 IST2021-06-25T04:13:28+5:302021-06-25T04:13:28+5:30
जळगाव : कोरोना महामारीत लॉकडाउनमध्ये ग्रंथालयांना ठोकलेले टाळे आता अनलॉक झाली आहेत. पण, अजूनही पाहिजे तसा प्रतिसाद सभासदांकडून मिळत ...

ग्रंथालये उघडली पण, सभासदांचा प्रतिसाद मिळेना
जळगाव : कोरोना महामारीत लॉकडाउनमध्ये ग्रंथालयांना ठोकलेले टाळे आता अनलॉक झाली आहेत. पण, अजूनही पाहिजे तसा प्रतिसाद सभासदांकडून मिळत नसल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यात पहायला मिळत आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. परिणामी, या काळात लोकांवर संस्कार करणारी ग्रंथालयांना सुध्दा टाळे लागली. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे जिल्हा अनलॉक करण्यात आला आहे. अनलॉकनंतर सभासदांसाठी सुध्दा ग्रंथालये उघडण्यात आली आहे. परंतु, ग्रंथालये उघडून दहा ते पंधरा दिवस उलटली, पण पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. दुसरीकडे शासनाकडून देखील कमी अधिक स्वरूपात अनुदान दिले जात आहे. एवढेच नव्हे तर वर्गणी सुध्दा गोळा झालेली नाही. त्यामुळे ग्रंथालय चालविणे आता कठीण झाले असल्याचे व.वा.वाचनालयाचे ग्रंथपाल अनिल अत्रे यांनी सांगितले. दरम्यान, नवीन पुस्तके सभासदांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभ्यासिका अजूनही सुरू करण्यात आलेली नाहीत, असेही त्यांनी सांगितले.