मनवेल येथे ऑनलाईन ग्रामसभेकडे ग्रामस्थांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:22 IST2021-09-10T04:22:39+5:302021-09-10T04:22:39+5:30
यामुळे सरपंच जयसिंग देवराम सोनवणे यांचा अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत कार्यलयात सुरू झालेली ही सभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली. ऑनलाईन ...

मनवेल येथे ऑनलाईन ग्रामसभेकडे ग्रामस्थांची पाठ
यामुळे सरपंच जयसिंग देवराम सोनवणे यांचा अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत कार्यलयात सुरू झालेली ही सभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली. ऑनलाईन ग्रामसभा ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेत सरपंच व दोन सदस्य वगळता इतर सदस्यांनी व ग्रामस्थांनी पाठ दाखवली. चार नागरिकांनी समस्यांचा पाढा वाढला. अर्धा तासात ग्रामसभा अध्यक्षाच्या परवानगीने संपली.
ग्रामसभेत गुरांचे लसीकरण करणे, गावातील फरशांची दयनीय अवस्था, रस्त्यावर रेती टाकणे व बंद ट्युबवेलच्या नुकसानीबाबत चर्चा करण्यात आली.
गावातील विविध नागरिकांकडे ग्रामपंचायतची थकबाकी मोठ्या प्रमाणात रखडलेली आहे. नागरिकांनी थकबाकी भरून ग्रामपंचायतला सहकार्य करावे. यानंतरच कामे त्वरित करण्यात येतील, असे ग्रामसेवक भरत पाटील यांनी स्पष्ट केले.
ग्रामसभेत गोविंद पाटील, चद्रशेखर पाटील, विनायक सोनवणे, उदयभान पाटील यांनी सहभाग घेतला तर ग्रामपंचायत सदस्य मंगलसिंग पाटील विकास पाटील यांनी ऑनलाईन हजेरी लावली.