वाघाने केली रेड्याची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 17:31 IST2021-03-31T17:15:11+5:302021-03-31T17:31:26+5:30

सुकळी शिवारातील शेतातील गोठ्यात बांधलेल्या रेड्यावर वाघाने हल्ला केला.

Leopard preys on Kelly Reddy | वाघाने केली रेड्याची शिकार

वाघाने केली रेड्याची शिकार

मतीन शेख
मुक्ताईनगर : तालुक्यातील सुकळी गावालगत बापूराव प्रल्हाद पाटील यांच्या गुरांच्या गोठ्यातील रेड्यावर वाघाने हल्ला चढवून फस्त केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली.
बापूराव पाटील यांचा गावालगत गुरांचा गोठा आहे. म्हैशी, बैल, गुरे, वासरे या गोठ्यात असतात. गोठ्याला लागूनच जिजाबराव पाटील यांच्या शेतात केळी बाग आहे. मध्यरात्री ते पहाटे दरम्यान वाघाने केळी बागेतून गोठ्यात प्रवेश करून तीन वर्षीय रेड्यावर हल्ला चढवून फस्त केले. गुरांच्या हंबरण्याने आणि कुत्र्यांच्या भुंकण्याने उडालेल्या गोंधळाने शेजारी असलेल्या ग्राम पंचायत सदस्या शारदा कोळी यांना जाग आली. मात्र अंधारामुळे काही दिसू शकले नाही.
गुरंढोरे मात्र जोरात हंबरडा देत होती. बापूराव पाटील सकाळी जेव्हा दूध काढण्यासाठी गोठ्यात पोहचले तेव्हा तीन वर्षीय रेडा वाघाची शिकार झाल्याचे समजले. वाघाने रेड्याला अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत सोडून दिल्याचे दिसून आले.
 या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. केळीबागेत कामे करण्यास जायला मजुरांमध्ये भीती पसरली आहे.
वनविभागाकडून घटनास्थळी पाहणी करण्यात आली. बिबट्याने शिकार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असताना या ठिकाणी वाघाचे पग मार्क आढळून आले आहेत. ट्रॅप  कॅमेरा लावून याचा मागोवा घेतला जाणार आहे.

Web Title: Leopard preys on Kelly Reddy