संजीव सोनवणे यांचे व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:13 IST2021-06-25T04:13:19+5:302021-06-25T04:13:19+5:30
जळगाव : राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात सामाजिक न्याय दिन साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने जिल्हा माहिती कार्यालयातर्फे ...

संजीव सोनवणे यांचे व्याख्यान
जळगाव : राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात सामाजिक न्याय दिन साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने जिल्हा माहिती कार्यालयातर्फे चोपडा येथील शिवव्याख्याते संजीव सोनवणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता ऑनलाईन लाईव्ह प्रसारीत करण्यात येईल.
कोविडमुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला कर्जा योजना
जळगाव : राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्लीतर्फे चर्मकार समाजासाठी ‘स्माईल्’ ही नवी योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यात कोविड १९ महामारीत ज्या कुटुंब प्रमुखाचे निधन झाले आहे. त्यात कुटुंबातील वारसांना एन. एस.एफ.डी. सी, नवी दिल्लीतर्फे ५ लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज दिले जाणार आहे. त्यात १ लाख रुपये भांडवली अनुदान मिळणार असून ४ लाख रुपये कर्ज हे सहा टक्के व्याज दराने मिळेल. अर्जदारांनी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज करावे, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापक एस.एल. तडवी यांनी केले आहे.
खेलरत्न पुरस्कारासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
जळगाव : केंद्र शासनाच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी नामनिर्देशाचे प्रस्ताव सादर करण्यासाठी २८ जून पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या आधी ही मुदत २१ जून पर्यंतच होती. आता याला मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी दिली.
नोर्गे पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
जळगाव : केंद्र सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयातर्फे तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार दिले जातात. त्या पुरस्कारांसाठी साहसी खेळांतील खेळाडूंनी १ जुलै पर्यंत प्रस्ताव दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी केले आहे.