नारखेडे शाळेत व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:22 IST2021-09-16T04:22:08+5:302021-09-16T04:22:08+5:30

भुसावळ : येथील एन.के. नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एन.के. नारखेडे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त व्याख्यान झाले. यावेळी संस्थेचे ...

Lecture at Narkhede School | नारखेडे शाळेत व्याख्यान

नारखेडे शाळेत व्याख्यान

भुसावळ : येथील एन.के. नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एन.के. नारखेडे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त व्याख्यान झाले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास एन.नारखेडे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, विद्यापीठ सिनेट सदस्या ॲड.कीर्ती पाटील, भारत विकास परिषदेचे योगेश मांडे, संस्थेचे चेअरमन व्ही.पाटील, संस्थेचे सभासद भाग्येश नारखेडे, प्रमोद नेमाडे, विकास पाचपांडे, विजय भंगाळे, अनिता नारखेडे, जयश्री पाटील, रवींद्र पाटील, जय पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका कोमल कुलकर्णी उपस्थित होते.

मान्यवरांनी एन.के.नारखेडे यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. भाषणातून एन.के. नारखेडे यांच्याबाबत आपले विचार प्रकट केले. त्यांनी सर्वांना पुढे जाण्याची प्रेरणा दिली, असे सांगितले.

यावेळी माजी मुख्याध्यापक व इतर मान्यवर, तसेच विद्यार्थी झूम ॲपवर १०० जणांचा सहभाग होता.

सूत्रसंचलन गजाला बासित यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय शबनम तडवी आणि धनश्री महाजन यांनी करून दिला. आभार प्रदर्शन अर्चना कोल्हे यांनी केले.

Web Title: Lecture at Narkhede School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.