‘महाराष्ट्रावर बोलू काही’ विषयावर वक्तृत्व स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 04:52 PM2019-08-22T16:52:43+5:302019-08-22T16:54:45+5:30

यावल पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे ‘युवा संसद’ कार्यक्रमातंर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा साने गुरूजी विद्यालयात पार पडली.

Lecture competition on 'Something to Speak on Maharashtra' | ‘महाराष्ट्रावर बोलू काही’ विषयावर वक्तृत्व स्पर्धा

‘महाराष्ट्रावर बोलू काही’ विषयावर वक्तृत्व स्पर्धा

googlenewsNext
ठळक मुद्दे युवा जागर कार्यक्रमभाग्यश्री नंदलाल साळी प्रथमकृष्णा माणिकराव जाधव द्वितीय दीपाली शिवाजी पाटील तृतीय

चुंचाळे, ता.यावल, जि.जळगाव : यावल पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे ‘युवा संसद’ कार्यक्रमातंर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा साने गुरूजी विद्यालयात पार पडली. युवा जागर कार्यक्रमांतर्गत ‘महाराष्ट्रावर बोलू काही’ या विषयावर विद्यार्थ्यांनी आपापल्या भूमिका वक्तृत्वातून मांडल्या.
गटशिक्षणाधिकारी एजाज शेख यांनी उद्घाटन केले. प्राचार्य एस.आर.वाघ अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार आधिकारी नईम शेख, मुख्याध्यापक गणेश गुरव, केद्रप्रमुख व्ही.आर.ठाकूर, दहिगाव, पी.एम.सोनार, किनगाव, किशोर चौधरी, साकळी उपस्थिते होते.
विजयी स्पर्धक प्रथम -भाग्यश्री नंदलाल साळी, म्युनिसीपल हायस्कूल, फैजपूर, द्वितीय -कृष्णा माणिकराव जाधव, भारत विद्यालय, न्हावी, तृतीय- दीपाली शिवाजी पाटील, सरस्वती हायस्कूल, यावल
प्रास्ताविक तालुका क्रीडा प्रमुख के.यु.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सुरवाडे यांनी, तर एस.ए.वाणी यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी श्रीकांत जोशी यांनी सहकार्य केले. विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Lecture competition on 'Something to Speak on Maharashtra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.